Asian Paints Dealership कशी मिळवायची? Asian Paints Dealership Information in Marathi

जर तुम्हाला एक नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही डीलरशिप घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतात. आज आपण Asian Paints Dealership कशी मिळवायची? बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला एखाद्या पेंट कंपनीची डीलरशिप हवी असेल तर आपण एशियन पेंट्स ही कंपनी निवडू शकतात. तर चला जाणून घेऊया Asian Paints Dealership Information in Marathi.

 

आपल्या भारत देशात जेवढा पेंट्स चा उद्योग होतो, म्हणजे जेवढा पेंट्स चा बाजार आहे, त्यापैकी जवळपास 40% हिस्सा हा एशियन पेंट्स (Asian Paints) या कंपनीने काबीज केलेला आहे. एशियन पेंट्स ही कंपनी आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पेंट कंपनी आहे. एशियन पेंट्स ही भारत देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी आहे. एशियन पेंट्स कंपनीच्या 16 देशांमध्ये उत्पादनांचे निर्माण करण्याकरिता फॅक्टरी उभारलेले आहेत. त्या देशात या कंपनीचा व्यवसाय सुरू आहे. एशियन पेंट कंपनी ही बर्जर इंटरनॅशनल या कंपनीची होल्डिंग कंपनी आहे. . आपल्या भारत देशामध्ये एशियन कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे कार्यरत आहे.

 

एशियन पेंट्स कंपनीची उत्पादने:-

एशियन पेंट्स कंपनी खालील उत्पादने बनविते व त्यांचे मार्केटिंग करते. आपल्या भारत देशामध्ये कंपनी पेंट्स, होम डेकोर उत्पादने, बाथरूम फिटिंग्ज आणि संबंधित उत्पादने, कोटिंग्जचे उत्पादन इत्यादी उत्पन्नाची विक्री आणि वितरण करते.How to get Asian Paints Dealership?

 

एशियन पेंट्स डीलरशिप प्रोग्राम

एशियन पेंट्स ही कंपनी फक्त डीलरशिप Asian Paints Dealership सुविधा ऑफर करते. इतर पेंट्स कंपन्यांप्रमाणे ही कंपनी सब-डीलरशिप व पेंट्स डिस्ट्रिब्युटरशिप ऑफर करत नाही.How to get Asian Paints Dealership?

 

एशियन पेंट्स डीलरशिप कशी मिळवायची? How to get Asian Paints Dealership in Marathi?

एशियन पेंट्स डीलरशिप Asian Paints Dealership मिळवण्याकरिता खालील प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागते.

सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एशियन पेंट्सच्या प्रदेश विक्री अधिकारी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. 18002095678 या Asian Paints Customer Care वर कॉल करून प्रदेश विक्री अधिकारी यांचा नंबर घेऊन त्यांना कॉल करा. त्यानंतर तुमच्या व्यवसायाच्या पार्श्वभूमी बद्दल जाणून घेण्याकरिता एशियन पेंट चे प्रदेश विक्री अधिकारी तुमच्या सोबत बैठक घेतील. तुम्ही ज्या ठिकाणी पेंटचे दुकान टाकणार आहात, त्या स्थानाबद्दल माहिती तसेच तुमचा पेंट्स फील्डमधील अनुभव त्याच प्रमाणे तुमची आर्थिक पार्श्वभूमी तसेच मी ज्या ठिकाणी दुकान टाकणार आहात, त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या डीलर ची संख्या इत्यादी बाबी पाहून ते तुम्हाला डीलरशिप देतील.

 

एशियन पेंट्स कंपनी माहिती मराठी Asian Paints Company Information In Marathi

एशियन पेंट्स ही एक भारतीय कंपनी आहे. एशियन पेंट्स ही कंपनी आशिया खंडात तीन नंबरला आहे तर भारत देशात या कंपनीचा पहिला नंबर लागतो. चंपकलाल चोक्सी, चिमणलाल चोक्सी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील या चार व्यक्तींनी सण 1942 मध्ये एशियन पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. अवघ्या कमी कालावधीतच ही कंपनी भारतातील टॉप पेंट ब्रँड कंपनी बनली. एशियन पेंट्स ही कंपनी पेंट्स बरोबरच बाथरूम फिटिंग, किचन फिटिंग असे उद्योग सांभाळत आहे. भारत देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी स्थापन झालेली ही कंपनी सध्या सुद्धा मार्केटमध्ये खूप मोठ्या पोझिशन वर आहे. Asian Paints Dealership

 

पेंट व्यवसाय सुरू करण्याकरिता कोणत्या बाबींमध्ये गुंतवणूक करावी लागते?

पेंट व्यवसाय सुरू करण्याकरिता गुंतवणूक मध्ये दुकान तसेच कलर मिक्सिंग मशीन व संगणक प्रणाली व फर्निचर इत्यादी बाबींमध्ये गुंतवणूक करावी लागते. तुम्हाला 500 ते 1000 चौरस फूट दुकानाची जागा एशियन पेंट्स डीलरशिप दुकान करिता आवश्यक आहे.

 

एशियन पेंट्स डीलरशिप करिता येणारा एकूण खर्च किती ? Asian Paints Dealership Cost

Asian Paints Dealership खालील प्रमाणे खर्च येतो.

1. सुरुवातीचा स्टॉक खरेदी करण्यासाठी 3 ते 3.50 लाख रुपये

2. संगणक आणि प्रिंटर 60 हजार रुपये

3. कलर मिक्सिंग मशीन खरेदी करण्यासाठी 1.50 लाख ते 2 लाख रुपये पर्यंत खर्च येतो.

4. फर्निचर व इंटीरियर, रॅक, साइनेज बोर्ड इत्यादी करिता 2 लाख रुपये पर्यंत खर्च येतो.

5. इतर खर्च 50,000

6. दुकान भाड्याने असल्यास भाडे खर्च

वरील प्रमाणे Asian Paints Dealership मिळवण्याकरिता एकूण खर्च हा 6 लाख रुपये ते 8 लाख रुपये पर्यंत येतो. हा खर्च कमी जास्त होऊ शकतो. Asian Paints Dealership Information in Marathi

Asian Paints Dealership मधून प्रॉफिट मार्जिन किती मिळते?

कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायातून प्रॉफिट मार्जिन किती मिळते? हे पाहणे अत्यंत महत्वाचे असते. त्या व्यवसायातून मिळणारा प्रॉफिट मार्जिन व सेल पाहूनच कोणताही व्यवसाय सुरू करावा.

Asian Paints Dealership मधून म्हणजेच एशियन पेंट्स उत्पादनाच्या विक्रीतून 3% ते 8% पर्यंत मार्जिन मिळते. इतर पेंट्स कंपन्यांशी तुलना केल्यास हा नफा कमी आहे. परंतु भारतीय मार्केट वर एशियन पेंट्स जास्त विक्री करतात, त्यामुळे इतर पेंट कंपन्यांच्या विक्री पेक्षा नक्कीच जास्त विक्री मिळेल. त्यामुळे नफा सुद्धा वाढेलच.

 

एशियन पेंट्स डीलर्स ना कोणत्या सुविधा पुरविते?

एशियन पेंट्स कंपनी त्यांच्या अधिकृत डीलर करिता RPBT सूट तसेच रोख सवलत सुविधा पुरविते. जर एशियन पेंट्स कंपनीच्या डीलर्स ने नऊ दिवसाच्या आत कंपनीला पेमेंट केल्यास कंपनी त्यांच्या डीलर्स ना 3.5% पर्यंत RPBT सूट देते. तसेच कंपनीच्या डीलर्स ने कंपनीला तीन दिवसाच्या आत पेमेंट केल्यास कंपनी डीलर्स ला 5 टक्के पर्यंत RPBT सवलत देते.

 

एशियन पेंट्स डीलरशिप करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Asian Paints Dealership

एशियन पेंट डीलरशिप मिळवण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

1. दुकानाचे स्थापना आणि नोंदणी प्रमाणपत्र

2. नगरपालिकेकडील व्यवसाय परवाना

3. एशियन पेंट्स कडील अधिकृतता प्रमाणपत्र

4. जीएसटी ची नोंदणी

5. दुकानाची कागदपत्रे किंवा भाडे करार

6. बँक स्टेटमेंट (6 महिन्यांचे)

 

एशियन पेंट्स संपर्क Asian Paints Contact Details

एशियन पेंट्स डीलरशिप मिळण्याकरिता कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा काही माहिती तुम्हाला एशियन पेंट्स कडून हवी असल्यास तुम्ही खाली दिलेल्या संपर्क पत्यावर संपर्क साधू शकतात.

एशियन पेंट्स ई-मेल: customercare@asianpaints.com

टोल-फ्री क्रमांक 18002095678

 

एशियन पेंट्स डीलरशिप संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. जर वरील पोस्ट संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा, आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू.

Leave a Comment