गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत एक चांगला बदल,बघा संपूर्ण माहिती | Benefits for women

राज्यामध्ये विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात व त्यातील शेतकऱ्यांसाठी ची एक योजना म्हणजेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, या योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आलेला आहे व याचा फायदा नक्कीच शेतकरी कुटुंबांना होणार आहे, घेण्यात आलेला निर्णय हा अतिशय शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे त्यामुळे अर्थातच योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांचे जास्त हित साधले जातील.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये करण्यात आलेला बदल म्हणजे आता शेतकऱ्याच्या पत्नीचा जर बाळंतपणामध्ये मृत्यू झाला तर 2 लाख रुपये एवढे अनुदान शेतकऱ्याला किंवा शेतकरी कुटुंबाला देण्यात येईल. बाळंतपणा दरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्यास शेतकरी अशा परिस्थितीमध्ये खचून जाऊ शकतो, त्यामुळे एक प्रकारची आर्थिक मदत शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत मिळेल.

आतापर्यंत अनेक वेळा बाळंतपणा दरम्यान शेतकऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झालेला असेल त्यामुळे अशा प्रकारची बाब गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये घेणे अत्यंत फायदेशीर आहे, आतापर्यंत अशाप्रकारे 118 प्रकरणांमध्ये शेतकरी कुटुंबाला अनुदानाचे वितरण देण्यात आलेले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विविध प्रकार आहेत, त्यामध्ये शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू,  वीज पडून मृत्यू इतरही प्रकारच्या अपघातांचा समावेश आहे त्यामध्ये अशा प्रकारचे अपघात किंवा शेतकऱ्यांच्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास योजनेअंतर्गत काही आवश्यक कागदपत्रे कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून जमा करावी लागणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत एक चांगला बदल,बघा संपूर्ण माहिती | Benefits for women

शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा करावी,अन्यथा 12% व्याजासह रक्कम द्यावी लागणार

Leave a Comment