महिलांना महिन्याला 1500 रुपये, 3 मोफत गॅस सिलेंडर, शिंदे सरकारचा मोठा निर्णय | Budget 2024 Maharashtra

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे अगदी महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंतचे मोठे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेले आहे, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेची चर्चा होत होती, अशाच लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे, व या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला रक्कम दिली जाणार आहे. याबरोबरच अनेक प्रकारच्या घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहे. 

 

ज्याप्रमाणे मध्य प्रदेश मध्ये लाडली बहना योजना चालू करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे, व यामध्ये 21 ते 60 वर्षाच्या वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत.

 

शेतकऱ्यांसाठीचा महत्त्वाचा निर्णय म्हणजेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केलेली आहे, यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश असेल तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपाचे सर्व थकित बिल सुद्धा माफ केले जाणार आहे, तसेच राज्यांमध्ये गाव तिथे गोदाम योजना सुद्धा राबवली जाईल.

 

वारकऱ्यांसाठीचा मोठा निर्णय म्हणजेच राज्यामध्ये वारकरी संप्रदाय मंडळ स्थापन केले जाईल, व पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना प्रतिदिंडी 20000 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे. तसेच मुलींचे परीक्षा शुल्क व प्रवेश शुल्क माफ केले जाणार आहे त्यामध्ये, व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींची संख्या वाढवण्यास सरकार कटीबद्ध असल्याने वैद्यकीय, वास्तुशास्त्र, अभियांत्रिकी याबरोबरच कृषी विषयक अभ्यासासाठी प्रवेशित असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल व इतर मागास प्रवर्गातील मुलींचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ केले जाईल.

 

शुभमंगल योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली असून, दहा हजार ऐवजी 20000 रुपयांचा निधी दिला जाईल, दुधावर प्रति लिटर पाच रुपये एवढे अनुदान दिले जाईल, तसेच 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा विचार शासनाचा आहे, महिलांना दहा हजार पिंक रिक्षा दिल्या जातील व रुग्णवाहिका सुद्धा खरेदी केल्या जातील अशी घोषणा करण्यात आलेली आहे. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षातून तीन गॅस मोफत दिले जाणार आहे, अशाप्रकारे अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहे.

 

या तारखे पर्यंत हे काम करा, अन्यथा गॅस कनेक्शन होईल बंद, गॅस कनेक्शन ची अंतिम मुदत

Leave a Comment