बजाज कंपनीच्या माध्यमातून जगातील पहिली सीएनजी बाईक निघाली, महाराष्ट्रातील नागरिकांना खरेदी करताना येणार बाईक | CNG Bike 

दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य बाईक धारकांना एवढ्या महागाईचे पेट्रोल विकत घेणे शक्य होत नाही आहे, त्यामुळे एक प्रकारचा उपाय म्हणून सीएनजी बाईक लॉन्च करण्यात आलेली आहे, व आजपासूनच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सीएनजी बाईकची खरेदी सर्वसामान्यांना करता येणार आहे, लॉन्च करण्यात आलेली बाईक बजाजी कंपनीच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेली असून उद्घाटन नितीन गडकरी यांनी केलेले आहे, तसेच लॉन्च करण्यात आलेली सीएनजी बाईकही जगातील पहिली सीएनजी बाईक असल्याचे बजाज कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.

 

सीएनजी पॅटर्न हा आजपर्यंत फक्त फोर व्हीलर गाड्यांमध्येच वापरण्यात येत होता परंतु आता दुचाकी वाहन सुद्धा सीएनजी वर चालणार आहे, सीएनजी टू व्हीलर बाइक लॉन्च केल्यानंतर नितीन गडकरी यांनी बजाज कंपनीला सीएनजी बाई ची किंमत किती असे विचारले व शक्यतोवर एक लाखापर्यंत या बाईची किंमत असावी अशी अपेक्षा ठेवली, व बजाज कंपनीच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या शब्दाचा मान राखून तीन प्रकारच्या बाईक लॉन्च करण्यात आलेल्या असून एक लाख दहा हजार रुपयापर्यंत बाईची किंमत असणार आहे त्यामध्ये एक बाईक 95 हजाराची दुसरी एक लाखाची तर तिसरी बाईक ही एक लाख दहा हजार रुपयांची असेल.

 

अनेकांना प्रश्न पडलेला असेल बाईक नेमकी किती किलोमीटर चालते म्हणजेच दोन किलो सीएनजी वर ही बाईक 230 किलोमीटर चालेल व त्यात दोन किलो सीएनजी व दोन किलो पेट्रोलचा वापर केल्यास 330 किलोमीटर एवढे अंतर ही बाईक काटेल, पेट्रोलच्या वाढत्या दराचा विचार करायचा झाल्यास अनेक नागरिक ही सीएनजी बाईक घेण्यासाठी इच्छा दाखवत आहे, परंतु बाईक मोठ्या प्रमाणात विक्री करणे ऐवजी सीएनजी पंपाची उपलब्धता सुद्धा करून द्यावी लागणार आहे, अशा प्रकारची तीन मॉडेलमध्ये बनवलेली बजाज कंपनीच्या माध्यमातून सीएनजी बाईक ग्राहकांना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

 

70 वर्षांपुढील वृद्धांना मिळणार आयुष्यमान योजने अंतर्गत मोफत उपचार, जाणून घ्या लाभ कसा मिळवायचा? 

Leave a Comment