खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली गेलेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केलेली असेल म्हणजेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण जर शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पादनामध्ये भरगोस प्रमाणात वाढ करायची असेल, तर कापसाला पहिला खताचा डोस अगदी वेळेवर देणे व चांगल्या प्रकारचा देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण त्यानुसारच कापसाच्या उत्पादनात भर पडू शकते.
राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केलेली आहे, तर काही शेतकऱ्यांच्या कापूस लागवडीला अनेक दिवस झालेली आहे, त्यामुळे कापसाची लागवड झालेली असेल तर कापसाला लवकरात लवकर खत देणे गरजेचे आहे, कारण खत व्यवस्थापन ही एक अत्यंत महत्त्वाची बाब कापूस शेतीमध्ये आहे. कारण अनेक शेतकऱ्यांना कापूस पिकाला नेमका खताचा पहिला डोस केव्हा द्यावा व कोणत्या प्रकारच्या खतांचा द्यावा ही बाब न कळाल्याने चुकीच्या वेळी कापसाला खत देतात, परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही त्यामुळे कापसाच्या उत्पादनात सुद्धा घट बघायला मिळते.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाच्या पिकाला कापूस लागवडीनंतर जवळपास पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये खत देणे गरजेचे आहे, कारण पहिले खत वेळेवर मिळाल्याने कापसाची जोमाने वाढ होऊन उत्पादनात भर पडू शकते, शेतकरी जर पहिल्या खतामध्ये 20-20-0-13 चा उपयोग करत असतील, तर प्रति एकर एक ते दीड बॅग खत पिकाला द्यावे, 10 26 26 एक ते दीड बॅग एका एकरामध्ये वापरावी, अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी योग्य खताचा उपयोग करून अगदी वेळेवर कापूस पिकाला खत द्यावे.
टीप: आम्ही शेतकरी बांधवांना कोणताही सल्ला देत नाही, शेतकरी बांधवांना विनंती आहे, त्यांनी स्वतः सर्व गोष्टींची चौकशी करावी तसेच कोणत्याही खत किंवा फवारणी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
आता या रेशन कार्ड धारकांना सुद्धा मिळणार आयुष्यमान कार्ड, जाणून घ्या कुणाला मिळेल लाभ