मागील अनेक दिवसांपासून एलपीजी ग्राहकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी परंतु अनेक नागरिक केवायसी प्रक्रिया कशी केली जाते, या माहितीपासून वंचित असून अनेकांनी आतापर्यंत एलपीजी ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही परंतु शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले होते, की संबंधित तारखेपर्यंत जर ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना सिलेंडर दिले जाणार नाही, परंतु अशी कोणतीही बाब केली जाणार नाही, म्हणजेच एलपीजी सिलेंडर धारकांना केवायसी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा नाही.
हरदीप सिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे, अनेकांमध्ये गैरसमज झालेले होते की आता आपण केवायसी न केल्यामुळे आता गॅस सिलेंडर मिळेल की नाही परंतु आता एलपीजी सिलेंडरची केवायसी करण्याची कोणत्याही प्रकारची कालमर्यादा नसून कोणत्याही कालावधीमध्ये ग्राहकांना केवायसी करता येणार आहे, केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा एकच उद्देश असून, जे नागरिक खोट्या प्रमाणात फसवे बुकिंग करून एलपीजी सिलेंडर घेतात अशांना फसवे काम करण्यापासून रोखले जाईल.
अनेक ग्राहकांना केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी? ही माहिती नाही त्यामुळे ज्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल, अशांनी एलपीजी डिलिव्हरी कर्मचारी सिलेंडर पोहोचवताना कागदपत्राची पडताळणी करत असतात, यांच्या माध्यमातून सुद्धा ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेता येणार का आहे, कारण ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल, त्यांच्या माध्यमातून ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल, अशा प्रकारची ही केवायसी प्रक्रिया अत्यंत सुलभ झालेली आहे.