मित्रांनो ग्रामीण तसेच निम शहरी व शहरी भागांमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेला व अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा व्यवसाय म्हणजे पिठाची गिरणीचा व्यवसाय होय. आपल्याला असलेल्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही एक महत्त्वाची गरज आहे आणि पिठाची गिरणी या व्यवसायात त्या मूलभूत गरजांचा समावेश असल्यामुळे हा व्यवसाय सर्वत्र असून या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.
पिठाची गिरणी व्यवसाय माहिती Pithachi Girani Business Information
पोळी चपाती किंवा भाकरी बनवण्याकरिता ते धान्य पिठाची गिरणीच्या माध्यमातून दळण्यात येत असते. अनेक पदार्थ बनवण्याकरिता पिठाचा वापर करण्यात येतो त्यामुळे हे पदार्थ पिठाची गिरणीच्या माध्यमातूनच तयार केले जात असतात. आपल्याला उपयोगात असलेले सर्व धान्य बारीक करण्याकरिता आपण चक्कीचा वापर करतो आणि या चक्कीलाच पिठाची गिरणी असे म्हणतात. पिठाची गिरणी हा जास्तीत जास्त मागणी असलेला फायदेशीर व्यवसाय असून हा व्यवसाय कोणीही करू शकतो. तसेच या व्यवसायामध्ये जास्त प्रमाणात भांडवल गुंतवण्याची आवश्यकता सुद्धा नसते. त्यामुळे पिठाची गिरणी व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेत आहोत. पिठाची गिरणी हा व्यवसाय(Flour mill business in Marathi) आपल्याला दोन पद्धतीने करता येतो पहिली पद्धत म्हणजे ग्राहकांचे धान्य त्यांना बारीक करून देणे किंवा आपण आपल्याकडील धान्य बारीक करून त्यांची भेट तयार करून ते विकणे.
ग्रामीण भागामध्ये जास्त करून हा व्यवसाय धान्य बारीक करून देण्याकरिता चक्की म्हणून वापरण्यात येतो. पूर्वीच्या काळी नंतर सामग्री उपलब्ध नसल्यामुळे पिठाच्या गिरणी उपलब्ध नव्हता त्यावेळेस आपण दगडी जात्याच्या माध्यमातून आपली धान्य बारीक करत असतो परंतु आता सर्वत्र पिठाच्या गिरणी उपलब्ध झाल्यामुळे याकरिता कष्ट कमी झालेल्या असून पिठाची गिरणीच्या माध्यमातून धान्य अगदी कमी वेळात बारीक करता येते. Flour mill business in Marathi
पिठाची गिरणीचा व्यवसाय हा सर्वत्र करता येतो जर तुमच्या आजूबाजूच्या भागांमध्ये जवळपास पिठाची गिरणी (pithachi girani Business) उपलब्ध नसेल तर हा व्यवसाय तुम्ही त्या ठिकाणी टाकून भरपूर नफा कमवू शकतात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धान्य बारीक करून पीठ तयार करण्याकरिता तुमच्याच गिरणीवर येतील. पिठाची गिरणी व्यवसाय(Floure Mill Business Ideas) सुरू करण्याकरिता मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता नसते सुरुवातीला आपण एखादी छोटीशी पीठ गिरणी विकत घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकतो. जर तुमचा व्यवसाय जास्त प्रमाणात चालत असेल तुमच्या पिठाची गिरणीवर जास्त ग्राहक येत असेल तर कालांतराने तुम्ही मोठी गिरणी घेऊन तुमच्या व्यवसाय वाढवू शकतात.
पिठाची गिरणी व्यवसाय असा करा सुरू How to start a flour mill business?
मित्रांनो पिठाची गिरणीचा व्यवसाय सुरू करण्याकरिता आपल्याकडे जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पिठाची गिरणी व्यवसाय सुरू करण्याकरिता आपल्याला पिठाची गिरणी खरेदी करावी लागते. त्याचप्रमाणे पिठाची गिरणी सुरु करण्याकरिता आपल्याकडे थोडेफार भांडवल देखील असण्याची आवश्यकता आहे. पिठाची गिरणी व्यवसायामध्ये पिठाची गिरणी खरेदी करण्याकरिता तसेच जागा विकत घेण्याकरिता किंवा भाड्याने घेण्याकरिता खर्च येतो. पिठाची गिरणी व्यवसाय सुरू करण्याकरिता ज्या ठिकाणी दाट मनुष्य वस्ती आहेत अशा ठिकाणी हा व्यवसाय सुरू करायला हवा. पिठाची गिरणी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ज्या भागांमध्ये जास्त पिठाच्या गिरण्या उपलब्ध नाही आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्राहक दूरच्या पिठाच्या गिरणीवर जात असेल तर त्या ठिकाणी आपण पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू केल्यास आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू शकतो. Flour Mill Business Ideas In Marathi
पिठाची गिरणी व्यवसाय करिता जागेची निवड? Choice of location for flour mill business?
मित्रांनो पिठाची गिरणी हा व्यवसाय (Flour mill business) सुरू करण्याकरिता सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे जागा. पिठाची गिरणी हा व्यवसाय आपण कोणत्याही ठिकाणी सुरू करू शकत नाही. एखाद्या नगरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जिथे मनुष्यवस्ती आहे परंतु जवळपास पिठाची गिरणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. जर तुम्ही पिठाची गिरणी हा व्यवसाय कमी भांडवलामध्ये सुरू करणार असाल तर सुरुवातीला जागा भाड्याने घ्यावी व हा व्यवसाय सुरू करावा. पिठाची गिरणीचा व्यवसाय सुरू करताना जागा भाड्याने घेताना भाडेकरार करून घ्यावा जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्या व्यवसायाची मागणी वाढल्यास ती जागा आपल्याकडे असेल. जर तुमच्या घरासमोर रिकामी जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात. Floure Mill Business Ideas in Marathi
पिठाची गिरणी व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता Capital requirement for starting flour mill business
पिठाची गिरणी व्यवसाय सुरू करण्याकरता आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात भांडवल असणे गरजेचे नसून थोडेफार भांडवल असले तरी सुद्धा हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. पिठाची गिरणी व्यवसायामध्ये सर्वात मोठे भांडवल म्हणजे पिठाची गिरणी खरेदी करणे होय. त्यानंतर तुम्हाला विज बिल व इतर मेंटेनन्स करिता थोडेफार भांडवलाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे जागा भाड्याने घेतल्यास दर महिन्याला भाडे द्यावे लागते. पिठाची गिरणी हा व्यवसाय आपण 50 हजार रुपये पासून सुद्धा सुरू करू शकतो. जर छोटी पिठाची गिरणी घेतल्यास खर्च सुद्धा कमी येतो. Floure Mill Business
पिठाची गिरणी व्यवसायाची नोंदणी आणि लायसन्स
पिठाची गिरणी(Pithachi Girani Vyavasay) या व्यवसायाची आपण जीएसटी रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याचप्रमाणे पिठाची गिरणी व्यवसायाची शॉप ॲक्ट लायसन काढू शकतात. त्याचप्रमाणे पिठाची गिरणी हा व्यवसाय खाद्यपदार्थाची निगडित असल्यामुळे FSSAI लायसन्स देखील काढू शकतो. पिठाची गिरणी व्यवसायाची शासन दरबारी नोंदणी केल्यास तसेच व्यवसाय संबंधित सर्व कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध असल्यास आपल्याला जर कर्ज हवे असेल तर कर्ज मिळू शकते त्यामुळे या व्यवसायाची नोंदणी करायला पाहिजे. Flour mill business plan in Marathi
पिठाची गिरणी व्यवसायात पॅकेजिंग
मित्रांनो पिठाची गिरणी हा व्यवसाय आपण सुरू करून पिठाची गिरणी या व्यवसायाच्या माध्यमातून विविध प्रकारचे पीठ तसेच वस्तू तसेच मटेरियल यांची पॅकिंग करू शकतो. व ती ग्राहकांना विकू शकतो. वेगवेगळ्या किरकोळ दुकानदारांना किंवा थेट ग्राहकांशी आपण पिठाची गिरणी विविध पीठ तसेच मटेरियल हे विकू शकतो. त्यामुळे पिठाची गिरणी या व्यवसायामध्ये आपण किलो प्रमाणे पॅकिंग करून ते विकू शकतो. जसे की अर्धा किलोचा पॅक व एक किलोचा, पाच किलो आणि दहा किलो याप्रमाणे.
पिठाची गिरणी व्यवसायाची मार्केटिंग Marketing of Flour Mill Business
मित्रांनो आपण पिठाची गिरणीचा नवीन व्यवसाय सुरू केल्यास सुरुवातीला बॅनर तसेच पापलेटच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकतात. तसेच व्हाट्सअप व फेसबुक यांसारखे सोशल मीडियाचा वापर करून देखील आपण आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करू शकतो. Flour mill business marketing
छोटी मोठी दुकाने तसेच मॉल किरकोळ विक्रेते यांच्याकडे जाऊन आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकतो. जर आपण पिठाची गिरणी हा व्यवसाय pithachi girani business केवळ पीठ बारीक करण्याकरिता मर्यादित ठेवणार असाल तर तुम्हाला जास्त मार्केटिंग करण्याची आवश्यकता नाही. आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांनी तुमच्या व्यवसाय बद्दल माहिती झाल्यास ते स्वतःहून तुमच्याकडे येतील.
पिठाची गिरणी व्यवसाय कर्मचाऱ्यांची आवश्यकता
मित्रांनो जर आपण छोटी पिठाची गिरणी विकत घेऊन हा व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू केला, तर आपल्याला सुरुवातीला कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत नाही. परंतु जर तुम्ही पिठाची गिरणी Flour mill business ideas या व्यवसायात विविध प्रकारच्या वस्तू तसेच धान्य हे पॅकिंग करून विकणारा असाल तर तुम्हाला ते पॅकिंग करण्याकरिता तसेच तुमचे प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याकरिता कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करू शकतात. सुरुवातीला हा व्यवसाय सुद्धा करून नंतर एखाद्या कर्मचारी ठेवून आवश्यकता भासल्यास हळूहळू तुम्ही कर्मचारी संख्या वाढवू शकतात. पिठाची गिरणी व्यवसाय pithachi girani vyavasay मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ही तुमच्या ग्राहकांवर अवलंबून असते.
अशाप्रकारे आपण पिठाची गिरणी हा व्यवसाय कमी खर्चात कसा सुरू करायचा? Flour mill business पिठाची गिरणी व्यवसायाकरिता येणारा खर्च तसेच गुंतवणूक व पिठाची गिरणी व्यवसायात कर्मचाऱ्यांची आवश्यकता तसेच पिठाची गिरणी या व्यवसायाची मार्केटिंग याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी या वेबसाईटवर भेट देत रहा.