कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात जोरदार पावसाची शक्यता, या भागात वर्तवला ऑरेंज अलर्ट, जुलै चा पहिला आठवडा पावसाचा | Havaman Andaj 

जुलै महिना चालू झालेला असून सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागांमध्ये चांगल्या सरीवर बरसताना दिसतात, राज्यातील अनेक भागांत हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे, याचे कारण म्हणजे, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेली असल्याने राज्यातील विविध भागांमध्ये पावसाळ्याने हजेरी लावलेली आहे, अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस गेल्या काही तासांपासून अनेक भागात चालू आहे.

 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू झालेला आहे, काही ठिकाणी नदी, नाली वाहून चाललेले आहेत, तर हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून 72 तास राज्यातील अनेक भागांमध्ये तुफानी पावसाचा इशारा वर्तवला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे व ज्या जुन्या इमारती असतील अशा ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावे कारण अशा इमारती पावसामुळे पडण्याची शक्यता असते.

 

राज्यातील सिंधुदुर्ग, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे, तसेच विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळ ठिकाणी पाऊस पडू शकतो, तर विदर्भ कोकण व मध्य महाराष्ट्र यासह मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुण्यातील घाट परिसरामध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो, राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा वर्तवलेला असून राज्यातील 3 जुलै पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे,या पावसाने एक प्रकाराचा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे, मराठवाड्यामध्ये पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी होईल व त्यांच्या पेरण्या सुद्धा चांगल्या प्रकारे पूर्ण होतील.

 

सोयाबीन पिकावर याच औषधाची पहिली फवारणी करा, शेतकऱ्यांना मिळणार उत्तम रिझल्ट

Leave a Comment