राज्यामध्ये हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे तसेच मानसून राज्यात दाखल झालेला असून तो सर्व दूर पोहोचलेला आहे, तर यामुळेच राज्यातील अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. एवढेच नव्हे तर राज्यातील अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे, तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू असून ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे.
कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशा प्रकारचा अंदाज हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून वर्तवला गेला, राज्यातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मुंबईचा उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झालेली होती व या पावसाचा जोर अजूनही काही तास राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
पुणे, ठाणे, कोल्हापूर, सातारा, मुंबई या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केलेला आहे, या भागात मुसळधार स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी परिस्थिती राज्यातील काही भागांमध्ये जरी असली तरी अनेक भाग असे आहेत की ज्या ठिकाणी अजूनही पाऊस आलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी अटकून पडलेली आहे व ज्या शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवलेली आहे अर्थात धूळपेरणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा चिंता भासत आहे.
तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून वारंवार शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे की, जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओल गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये त्यामुळे तुमच्या भागात जर चांगला पाऊस पडलेला नसेल तर त्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. त्यामुळे अशा प्रकारचा हवामान अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तर काही भागात पावसाची शक्यता आहे.
या तारखे पर्यंत हे काम करा, अन्यथा गॅस कनेक्शन होईल बंद, गॅस कनेक्शन ची अंतिम मुदत