दुग्ध व्यवसाय(Dairy Farming) कसा सुरू करावा? How to Start a Dairy Farming Business Information in Marathi

मित्रांनो जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल, म्हणजेच डेअरी फार्मिंग(Dairy Farming Business) करायचा असेल तर तो व्यवसाय कसा सुरू करायचा? डेअरी फार्मिंग व्यवसायातून मिळणारा नफा तसेच जनावरांचे प्रमाण व कर्मचारी व्यवस्थापन तसेच डेअरी फार्मिंग बद्दल संपूर्ण माहिती Dairy Farming Business Information in Marathi आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

सध्या आपल्या भारत देशामध्ये दुग्धोत्पादनाचा व्यवसाय हा खूप प्रचलित आहे. डेअरी फार्मिंग हा व्यवसाय नफा मिळवून देणारा चांगला व्यवसाय आहे. डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू केल्यास विविध मार्गाने उत्पन्न मिळते त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे बरेच तरुण ह्या व्यवसायामध्ये उतरू इच्छित आहे. त्यामुळे डेअरी फार्मिंग व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहे. डेअरी फार्मिंग हा व्यवसाय दुग्धोत्पादनाशी संबंधित असा व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायात दूध उत्पादन करण्याचा उद्देश ठेवून म्हैस किंवा शेळी पालन किंवा गाय यांचे पालन करूनच हा व्यवसाय करता येईल.

 

दुग्ध व्यवसाय कसा सुरू करायचा? How to Start Dairy Farming Business

आता आपण दुग्ध व्यवसाय कसा सुरू करायचा?How to Start Dairy Farming Business याविषयी माहिती जाणून घेऊया. दुग्ध व्यवसाय सुरू करण्याकरिता आपल्याला तीन टप्प्यांमध्ये तो व्यवसाय सुरू करता येतो. यामधील तीन टप्पे खालील प्रमाणे आहेत.

1. जनावरांची खरेदी

2. खाद्य, शेड, विज बिल, मजुरी

3. दुधाची मार्केटिंग

डेअरी फार्मिंग हा व्यवसाय सुरू करण्याकरिता आपल्याकडे गाई किंवा म्हशी असाव्या लागतात. जर एखाद्या व्यक्तीला डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर जास्त भांडवल नसल्यास कमीत कमी दहा गाई किंवा दहा म्हशी घेऊन डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू करता येतो. त्याचबरोबर जनावरांना राहण्याकरिता गोठा म्हणजे शेडची बांधणी करावी लागते. शेडची उभारणी करताना प्रत्येक जनावरा करिता 30 ते 40 फूट जागा सोडणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या जनावरांना व्यवस्थितपणे उठता व बसता येईल. How to Start Dairy Farming Business

त्याचप्रमाणे शेडमध्ये जनावरांना चारा खाण्याकरिता गव्हाणीची उभारणी करावी लागते. गव्हाणी शक्यतो गोल शेप मध्ये बांधावी जेणेकरून जनावरांना चारा खाण्यास कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि गव्हाणी मध्ये चारा शिल्लक राहणार नाही.

 

दुग्ध व्यवसाय सुरू करण्याकरिता जनावरांची निवड कशी करायची?

दुग्ध व्यवसाय सुरू करण्याकरिता साधारणपणे 15 ते 20 लिटर प्रति दिवस दूध देणाऱ्या जनावरांची निवड करायची. जनावरांना ज्या पद्धतीने आपण चारा खाऊ घालू त्यांचे व्यवस्थापन करू जनावरांची निगा राखणे त्या पद्धतीने जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढते. व आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पादन होऊ शकते. चांगल्या प्रजननक्षम जातींच्या जनावरांची निवड करावी.

डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू करण्याकरिता आपल्याला कोणत्याही विशेष कौशल्य असण्याची गरज नाही. डेअरी फार्मिंग करत असताना जनावरांची निवड करताना प्राण्यांची जात पाहून निवड करणे. तसेच जनावरांचे राहणीमान चांगले राहण्यासाठी प्रयत्न करणे व जनावरांना पोषक आहार देणे त्यांची योग्य ती काळजी घेणे इत्यादी बाबींची व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. डेअरी फार्मिंग हा व्यवसाय श्रमावर अवलंबून आहे त्यामुळे आपल्याला जनावरांची निगा राखण्याकरिता तसेच जनावरांना योग्य वेळेस चारा खाऊ घालण्याकरिता कष्टाळू व्यक्तींना कामावर ठेवावी लागेल.

 

डेअरी फार्मिंग मध्ये असणारा स्कोप ? What is the scope in dairy farming?

मित्रांनो आपला भारत देश हा पशुधन समृद्ध असणारा देश आहे. आपल्या भारत देशामध्ये जनावरांच्या अनेक प्रकारच्या प्रजाती आढळतात. दुग्ध व्यवसाय मध्ये आत्मनिर्भर असा आपला भारत देश आहे. आपल्या भारत देशात जगातील सर्वात जास्त पशुधन आढळते. संपूर्ण देशातील पशुधनाचा टक्केवारी मध्ये विचार केल्यास जवळपास 58% पशुधन आपल्या भारत देशात आढळते. आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी जवळपास 12 कोटी टन दुधाचे उत्पादन होते. त्याचबरोबर आपल्या भारत देशामध्ये दुधाची मार्केटिंग करण्याकरिता सुद्धा खूप मोठी वाव आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता डेअरी फार्मिंग हा व्यवसाय अतिशय चांगला पर्याय आहे.

 

डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू करण्याकरिता येणारा खर्च किती?

डेअरी फार्मिंग व्यवसाय (Dairy Farming Business in Marathi) सुरू करताना आपल्याला जनावरांची खरेदी करावी लागते त्याचप्रमाणे जनावरं करिता शेड व चाऱ्याची व्यवस्थापन व कर्मचारी व्यवस्थापन करावे लागते. त्याचप्रमाणे दुधाच्या मार्केटिंग करिता सुद्धा खर्च येतो. त्यामुळे जर आपण छोट्या प्रमाणात कमी जनावरे घेऊन व्यवसाय सुरू करत असाल तर सुरुवातीला कमी खर्च येतो. उत्पन्न सुद्धा कमी होते. जर आपण 30 दुभत्या जनावरांची खरेदी केली तर त्यांच्यासाठी शेड व जनावरांची खरेदी यांच्याकरिता 20 लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. जर आपण सुरुवातीला दहा जनावरे खरेदी केली तर खर्च कमी येईल. डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू करण्याकरिता कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. How to Start a Dairy Farming Business Information in Marathi

 

डेअरी फार्मिंग व्यवसाय करिता जागा कशी निवडावी?

कोणताही व्यवसाय करण्याकरिता त्या व्यवसायाची जागा महत्त्वाची असते. आपण ज्या जागेवर व्यवसाय उभा करणार आहोत ती जागा कशी आहे? यावर व्यवसायाच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. ज्या जागेवर आपण डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू करणार आहोत, त्या जागेवर मुबलक पाण्याची व्यवस्था असावी तसेच आपण ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू करत आहोत ते ठिकाण शहराला लागून किंवा शहराच्या आत असावे, जेणेकरून आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लगेच दूध पाठवता येईल. कारण की दूध हा नाशवंत घटक असल्यामुळे जास्त वेळ आपण त्याला साठवून ठेवू शकत नाही लगेच दुधाला विकण्याकरिता न्यावे लागते.

हे नक्की वाचा : नववी नापास मराठी तरुण आज आहे उद्योजक

डेअरी फार्मिंग व्यवसायामध्ये असणारी जोखीम Risks involved in dairy farming business

कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असतेच. डेअरी फार्मिंग या व्यवसायामध्ये जखमीचे प्रमाण हे कमी आहे. जोखीम हा एक व्यवसायाचा अविभाज्य भाग असतो. परंतु इतर व्यवसायाच्या तुलनेत डेअरी फार्मिंग या व्यवसायामध्ये असणारी जोखीम अल्प आहे. जनावरांना होणारा आजार तसेच दुधाची साठवण ही जोखीम आहे.

 

डेअरी फार्मिंग व्यवसायाची नोंदणी Registration of Dairy Farming Business

मित्रांनो आजच्या काळात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय भारत देशात सुरू करण्यासाठी आपल्याला त्या व्यवसायाची जीएसटी नोंदणी करावी लागते. दुग्ध व्यवसाय हा खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवहार करणारा व्यवसाय असल्यामुळे जीएसटी नोंदणी बरोबरच FSSAI आणि Veg Certificate नोंदणी करता येते. जर तुम्हाला तुमचा डेअरी फार्मिंग चा व्यवसाय कंपनीप्रमाणे वाढवायचा असेल तर तुम्ही स्वतःची कंपनी उघडू शकता. त्याकरिता तुम्हाला तुमच्या डेरी फार्मिंग व्यवसायाची कंपनी म्हणून नोंदणी करावी लागते. त्याकरिता एक नाव तुम्हाला द्यावे लागेल. त्याचबरोबर तुम्हाला पशुवैद्यकीय नोंदणी करावी लागेल.

 

डेअरी फार्मिंग व्यवसाय मध्ये दुधाची पॅकेजिंग

डेअरी फार्मिंग (Dairy Farming Business Information in Marathi)व्यवसायातून मिळालेले दूध विकायचे असेल तर आपल्याला पॅकेजिंग करून विकावे लागते. त्याकरिता तुम्हाला पॅकेजिंग बॉक्स तसेच दुधाच्या पाकिटावर दुग्ध व्यवसायाचे नाव तसेच दूध पॅक केल्याची तारीख व आपल्या दूध व्यवसायाचा पत्ता नमूद करता येतो. आपल्या दुधाची पॅकेजिंग करून विक्री केल्यामुळे एक प्रकारे आपल्या व्यवसायाची जाहिरात होते. याचा फायदा आपल्याला भविष्य काळामध्ये होतो. दुधाची पॅकेजिंग करून विक्री करण्याकरिता तुम्ही ऑर्डर प्रमाणे दूध पाकीट खरेदी करू शकतात. किंवा स्वतः देखील बनवू शकतात.

 

डेअरी फार्मिंग व्यवसायातून मिळणारा नफा Profit from dairy farming business

डेअरी फार्मिंग(Dairy Farming Business in Marathi) हा व्यवसाय खूप नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. डेअरी फार्मिंग व्यवसाय मधून आपण 30 ते 40 टक्के पर्यंत नफा मिळवू शकतो. डेअरी फार्मिंग या व्यवसायामध्ये विविध मार्गाने उत्पन्न मिळते. जसे की आपण दूध, दही बाजारामध्ये विकू शकतो. तसेच आपण तूप व पनीर हे सुद्धा विकू शकतो. त्याचबरोबर डेअरी फार्मिंग व्यवसायाच्या माध्यमातून आपण जनावरांचे शेण हे शेणखत म्हणून विकू शकतो. शेणखताच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आपल्याला मिळते. ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेणखताला जास्त महत्त्व देते त्यामुळे शेणखताला खूप मागणी आहे.

हे नक्की वाचा: asian paints dealership काशी मिळवायची ?

डेअरी फार्मिंग व्यवसायाची मार्केटिंग

डेअरी फार्मिंग हा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला आपले दूध मार्केटमध्ये विकण्याकरिता तसेच दुग्ध व्यवसायाशी संबंधित प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकण्याकरिता आपल्याला आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करणे आवश्यक आहे. कोणताही व्यवसाय यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा त्या व्यवसायाची योग्य रीतीने मार्केटिंग करण्यात येते. जेवढा आपला व्यवसाय लोकप्रिय होईल तेवढ्या प्रमाणात आपले प्रॉडक्ट विकल्या जातील आपला नफा वाढेल त्यामुळे आपण आपल्या व्यवसायातील गुंतवणूक वाढू शकतो तसेच व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारू शकतो. दुग्ध व्यवसायामध्ये विपणन प्रक्रियेला खूप महत्त्व आहे कारण की हे एक नाशवंत पदार्थ आहे.

Dairy Farming Business संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, अश्याच business संबंधित माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment