किराणा दुकान हा एक महत्त्वपूर्ण असा व्यवसाय आहे जो आपण ग्रामीण भागात तसेच शहरी भागांमध्ये सुरू करू शकतो. आज खेड्यापाड्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये आपल्याला अनेक छोटी मोठी किराणा दुकाने दिसतात. किराणा दुकान व्यवसाय कसा सुरू करायचा? किराणा दुकानांमध्ये असणारा स्कोप तसेच किराणा दुकान सुरू करण्याकरिता आवश्यक असणारे भांडवल इत्यादी सर्व बाबी तसेच किराणा दुकान सुरू करण्याकरिता येणारा खर्च या सर्व बाबींचा अंदाज घेऊन किराणा दुकान व्यवसाय सुरू करायचा असतो. आजच्या या पोस्टमध्ये How to Start a Grocery Store Business? या विषयावर विस्तृत माहिती जाणून घेऊया.
नवीन किराणा दुकान सुरू करणे हा एक सुंदर असा व्यवसाय कल्पना आहे. किराणा दुकान सुरू केल्यास आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. एकदा किराणा दुकानाच्या व्यवसायामध्ये आपण नावलौकिक मिळवल्यास म्हणजेच आपल्या दुकानाची ख्याती वाढल्यास रोजचा होणारा व्यवसाय जास्त होऊन नफ्याचे प्रमाण वाढते. किराणा दुकान हा एक असा व्यवसाय प्रकार आहे ज्याची मागणी कधीच कमी होत नाही. दिवसेंदिवस या व्यवसायामध्ये ग्राहक वाढत जातात. या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवायचा असल्यास तो व्यवसाय आपल्याला व्यवस्थितपणे चालवावा लागतो.
किराणा दुकान म्हणजे काय? Kirana Dukan Mahiti Marathi :-
मित्रांनो आपल्याला दैनंदिन उपयोगाच्या अनेक वस्तूंची गरज पडत असते, त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ तसेच सौंदर्यप्रसाधने व इतर वस्तू ज्या आपल्याला किराणा दुकानाच्या माध्यमातून खरेदी करता येतात. किराणा दुकानांमध्ये गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध असतात. किराणा दुकानाला मिनी सुपर मार्केट असे सुद्धा म्हटले जाते. आपल्याला आपल्या घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या सर्व वस्तू किराणा दुकानांमध्ये मिळतात. किराणा दुकानदार मोठ्या विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतात व ते ग्राहकांना उपलब्ध करून देतात. यामध्ये त्यांचा नफा समाविष्ट असतो. किराणा दुकान तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला मिळतील.grocery store Information Marathi
आपण ज्या क्षेत्रामध्ये किराणा दुकान व्यवसाय सुरू केलेला आहे त्या क्षेत्रातील लोकांच्या आवडीनिवडीनुसार आपण आपल्या किराणा दुकानांमध्ये वस्तू ठेवल्या पाहिजे. त्याचप्रमाणे किराणा दुकानांमध्ये हंगामानुसार काही वस्तू नवीन ठेवावे लागतात. किराणा दुकानदाराचा ग्राहकांशी वैयक्तिक संबंध येत असतो. किराणा दुकानदार ग्राहकांना क्रेडिट सुविधा सुद्धा उपलब्ध करून देत असते. Grocery Shop Business Information In Marathi
किराणा दुकान कसे सुरु करावे? How To Start Grocery Shop
मित्रांनो आपण किराणा(Kirana Dukan) दुकानाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. आता आपण किराणा दुकान व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल माहिती जाणून घेऊया. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपण त्या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे तो व्यवसाय आपण ज्या भागांमध्ये आपली किराणा दुकान सुरू करणार आहोत. त्या भागात तो व्यवसाय चालणार की नाही याचा अंदाज घेतला पाहिजे.
किराणा दुकान(grocery shop business information in Marathi) सुरू करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या किराणा दुकानांमध्ये ग्राहपयोगी वस्तू ठेवण्याकरिता गुंतवणूक करावी लागते. म्हणजेच तुम्हाला मोठ्या विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी कराव्या लागतात. किराणा दुकान सुरू करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला गुंतवणूक जास्त प्रमाणात करावे लागते. त्यानंतर ग्राहक वस्तू खरेदी करतात त्यापासून आपण खरेदी केलेल्या वस्तूची किंमत तसेच आपल्या नफा आपल्याला मिळतो. त्यानंतरचा दुसरा स्टॉक आपण मिळालेल्या पैशातून सहज खरेदी करू शकतो. त्यामुळे किराणा दुकान सुरू करण्याकरिता प्रारंभिक भांडवल जास्त लागते.
पिठाची गिरणी व्यवसाय कसा सुरू करायचा?
किराणा दुकान सुरू करण्याकरिता एक चांगली जागा आपल्याला निवडावी लागते. त्या ठिकाणी आपल्या दुकानाचे बांधकाम करून आपले दुकान सुरू करावे लागते.
किराणा दुकान व्यवसाय सुरू करण्याकरिता जागा कशी निवडावी? Choosing a location to start a grocery store business?
मित्रांनो किराणा दुकानात नाही तर कोणताही व्यवसाय सुरू करण्याकरिता सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे ज्या ठिकाणी आपण व्यवसाय सुरू करणार आहोत ती जागा. एक वेळेस आपण किराणा दुकान व्यवसाय करिता जागा निवडली किती कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहते. आपले किराणा दुकान जुनी झाल्यानंतर ग्राहक त्याच जागेवर येऊन आपल्या दुकानातून वस्तूंची खरेदी करून जातात. त्यामुळे जागा निवडताना शक्यतो आपल्याला जास्तीत जास्त ग्राहक मिळेल अशी जागा निवडावी. किराणा दुकाना करिता जागा मिळण्याकरिता आपण गजबजलेले रस्ते, हाउसिंग सोसायटी, रुग्णालये, मंदिरे या प्रकारच्या ठिकाणांची निवड करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या दुकानाचे ठिकाण निवडताना आपल्या आजूबाजूला जास्त दुकाने नसतील असे ठिकाणी निवडावे. आपण ग्राहकांबरोबर कशा पद्धतीने व्यवहार करतो तसेच ग्राहकांना बोलण्याची पद्धत यानुसार आपले ग्राहक वाढत जातात व आपला नफा सुद्धा वाढत जातो. किराणा दुकानांमध्ये आपला संबंध हा शेवटच्या ग्राहकाशी येत असल्यामुळे आपल्या बोलण्या चालण्यावरून आपल्या व्यवसायातील विक्री तसेच नफा ठरतो.
किराणा दुकान व्यवसाय कोण सुरू करू शकतो? Who Can Open Grocery Store :-
किराणा दुकान कुणीही उघडू शकतो ज्याला थोडीफार बेरीज व वजाबाकी तसेच गणना करता येते अशी कोणतीही व्यक्ती किराणा दुकान उघडू शकते. किराणा दुकान उघडण्याकरिता आपल्याला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक अट नसते. किराणा दुकान उघडण्यापूर्वी आपण वस्तू कोणत्या विक्रेत्याकडून खरेदी करायच्या तसेच वस्तूंच्या किमती व दुकानाची जागा याबद्दल माहिती घ्यावी.
किराणा दुकान करिता सामान कुठून खरेदी करायचे Kirana Dukan in Marathi:-
मित्रांनो किरण दुकान सुरू करताना आपल्याला त्या किराणा दुकानांमध्ये ग्राहकांना उपयोगी असणाऱ्या वस्तू तसेच सामान उपलब्ध करून द्यावे लागते. त्या सामानांची खरेदी आपण कुठून करायची हा प्रश्न पडतो. मोठ्या पुरवठादारांशी संपर्क करून या वस्तू आपण खरेदी करू शकतो. किराणा दुकानाकरिता लागणारे आवश्यक वस्तू आपण होलसेल विक्रेत्या करून खरेदी करू शकतो. जर आपल्या किराणा दुकानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादे होलसेल दुकान असेल तर त्या ठिकाणाहून आपण त्या वस्तू खरेदी करू शकतात, जेणेकरून त्या वस्तूंवरील वाहतूक खर्च वाचून आपला नफा वाढू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला एखादा होलसेल विक्रेता क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देत असेल तर त्यांच्याकडून सुद्धा आपण सामानाची खरेदी करू शकतो.
किराणा दुकान सुरू करण्याकरिता येणारा खर्च Cost of starting a grocery store :-
किराणा दुकान सुरू करायचे असल्यास आपल्याला सामानाची खरेदी करावी लागते त्याचप्रमाणे किराणा दुकान सुरू करण्यासाठी फर्निचर तसेच इतर वस्तू खरेदी करावे लागतात त्यामुळे किराणा दुकान सुरू करण्याकरिता आपल्याला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये खर्च येऊ शकतो. जर आपण छोटे किराणा दुकान सुरू केले तर खर्च कमी येतो.
किराणा दुकानांमध्ये फ्रिज आवश्यक असतो त्यामुळे फ्रिज करिता 30000 रुपये तर काउंटर तयार करण्याकरिता 15000 व डिस्प्ले रैक करिता 30000 तसेच सामानासाठी 1 लाख रुपये तसेच ग्रोसरी रैक 25000 फर्निचर करिता 50000 इत्यादी खर्च आपल्याला येतो.
पेपर प्लेट व्यवसाय कसा सुरू करायचा?
किराणा दुकाना करिता आवश्यक टिप्स Essential tips for grocery shopping:-
मित्रांनो जर आपण आपले एखादी किराणा दुकान सुरू केले तर सुरुवातीला आपले दुकान नवीन असल्यामुळे जास्त ग्राहक येणार नाही त्यामुळे आपण एखादी ऑफर्स चालवू शकतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या किराणा दुकानाची जाहिरात करू शकतो. त्याचप्रमाणे किराणा दुकान जास्तीत जास्त चालावी याकरिता सुरुवातीला वस्तूंच्या किमती इतर दुकानांपेक्षा कमी ठेवू शकतो. ग्राहकांना खूपच सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो छोट्या मोठ्या ऑफर्स देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण होम डिलिव्हरी तसेच फोनवरून ऑर्डर स्वीकारणे अशा प्रकारच्या बाबींचा स्वीकार केल्यास नक्कीच किराणा दुकान जास्तीत जास्त चालून जास्तीत जास्त नफा मिळेल. नवीन किराणा दुकान सुरू केल्यानंतर किराणा दुकानाचे पोस्टर छापून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे. त्याचप्रमाणे ग्राहकांशी वागण्याचा व बोलण्याचा पद्धत चांगली ठेवणे.
किराणा दुकानांमध्ये मिळणारा नफा किती? What is the profit in grocery stores?
जर आपण सुरुवातीला नवीन दुकान सुरू केल्यास नवीन किराणा दुकान(grocery store in Marathi) मध्ये जास्त ग्राहक येणार नाही त्यामुळे सुरुवातीला तुमचा नफा कमी असेल. परंतु एक वेळेस तुमच्या दुकानाची ख्याती झाल्यानंतर तुमच्या दुकानांमध्ये जास्तीत जास्त ग्राहक येतील व तुमच्या दुकानाचा सेल वाढेल व तुमचा नफाही वाढेल. जर आपण दोन लाख रुपये गुंतवणूक करून किराणा दुकान सुरू केल्यास तीस ते चाळीस हजार रुपये पर्यंत महिन्याला नफा आपण किराणा दुकानाच्या माध्यमातून मिळवू शकतो. किराणा दुकानांमध्ये मिळणारा नफा हा आपल्या किराणा दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर अवलंबून असतो.
किराणा दुकान करिता कामगारांची आवश्यकता Kirana Dukan Business Ideas
जर आपण एखाद्या खेडेगावात एखादा छोटासा किराणा दुकान(kirana store) सुरू केल्यास आपल्याला कामगाराची आवश्यकता पडणार नाही. कारण की खेडेगावात असणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे आपण ते एकट्याने मॅनेज करू शकतो. परंतु जर आपण मोठ्या प्रमाणात किराणा दुकानाचा व्यवसाय सुरू केल्यास जास्त ग्राहक येथील त्यामुळे एकट्याकडून ते शक्य होणार नाही. एका व्यक्तीला काउंटरवर बसावे लागेल, किमान एक ते दोन व्यक्ती ग्राहकांना माल वितरित करण्याकरिता आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला किमान दोन व्यक्ती कामगार म्हणून ठेवावे लागतील.