तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे? हे चेक करा अगदी सहज पद्धतीने व याच खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार | Khate Chek Aadhar Link

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये महिना याप्रमाणे पैशाचे वितरण केले जाणार आहे, येणारा हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे, याची लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी अर्ज केलेले असून अनेक महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे, तर काही महिलांना त्यामध्ये दुरुस्त्या कराव्या लागत आहे.

 

तुमचा अर्ज जर मंजूर झालेला असेल तर अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून महिलांनी आधार कार्ड ला आपले कोणते बँक खाते लिंक आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण येणारे माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.

 

आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ओपन करावे https://resident.uidai.gov.in/bank-mapper लोगिन हे ऑप्शन दिसेल ते ऑप्शन निवडा व एंटर करा, त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून बॉक्समध्ये देण्यात आलेला कॅपच्या कोड जशास तसा टाका, त्यानंतर आलेला ओटीपी इंटर करून लॉगिन पर्याय निवडा. बँकिंग शेडिंग स्टेटस सिलेक्ट करून त्या ठिकाणी कोणत्या बँकेचे नाव दाखवले जात आहे हे बघा, ज्या बँकेचे नाव दाखवले जाईल त्याच खात्यावर लाडकी बहीण योजनेचे व इतर अनुदानाचे सुद्धा पैसे जमा होतील.

 

कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत 95 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार सोलार पंप, अर्ज सुरू

Leave a Comment