या महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात सुरू, शासन निर्णय आला! | Ladaki Bahin Yoajan

राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मागील काही दिवसांपासून चर्चा चालू होती की महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना चालू करण्यात येणार आहे, कारण ज्याप्रमाणे मध्य प्रदेश मध्ये शासनाच्या माध्यमातून लाडली बहना योजना चालू करण्यात आलेली असून, मागील काही दिवसांपासून या योजनेचा लाभ मध्य प्रदेश मधील महिला घेत आहे, अशाच प्रकारची एक योजना म्हणजेच महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार होती ती योजना लाडकी बहिणी योजना याच योजनेची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना राबवली जाणार असल्याची घोषणा केलेली आहे. 

 

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बजेट सादर करण्यात आला व त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे, त्यातीलच एक महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली असून योजनेच्या माध्यमातून प्रति महिना 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

 

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना एक प्रकारची आर्थिक सहाय्य व्हावे त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी एक प्रकारची संधी मिळावी, त्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी योजना जाहीर करण्यात आलेली आहे, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे, या योजनेमध्ये 21 ते 60 वर्षाच्या वयोगटातील महिला पात्र होणार आहेत. योजनेची सुरुवात सुद्धा अगदी काही दिवसातच म्हणजे जुलै 2024 मध्ये होणार आहे. अशाप्रकारे ही योजना राज्यातील महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, कारण एका वर्षामध्ये योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर 18 हजार रुपये जमा होतील.

योजनेचा शासन निर्णय लिंक

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, विधवा महिलांपासून ते ग्रामीण विकासासाठी चे मोठे निर्णय 

Leave a Comment