महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली असून, मोठ्या प्रमाणात महिलांनी आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, परंतु महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने 15 जुलैपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नव्हते त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण करत आहेत, परंतु अनेक महिला सुशिक्षित नसल्याने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे त्यांना शक्य होत नाही आहे, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे, व आता महिलांना ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करत असताना सीएसटी सेंटरवर जाऊन अथवा आपल्याच मोबाईल वरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार होती परंतु अशिक्षित असलेल्या महिलांना अत्यंत सूलभ प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे, त्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पूर्ण करताना जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा अंगणवाडी सेविका कडून त्या ठिकाणी अर्ज करावा लागेल म्हणजे अंगणवाडी सेविका ऑफलाइन पद्धतीने तुमचा अर्ज घेणार आहे शक्यतो अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज घेऊन तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल व अंगणवाडी सेवेच्या माध्यमातून तुमच्या अर्जातील पुढील प्रक्रिया केली जाईल.
अशाप्रकारे वरील दिलेल्या माहितीनुसार ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज प्रक्रिया महिलांना पूर्ण करणे शक्य झालेले आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले असून ज्या महिलांनी अर्ज केलेले नाही, अशा महिलांनी सुद्धा लवकरात लवकर अर्ज करावे, अशा प्रकारचे आवाहन सुद्धा महिलांना केली जात आहे, तसेच लाडकी बहीण योजनेचे दोन वेतन आता रक्षाबंधनला देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात येत आहे, जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून एकदाच म्हणजेच रक्षाबंधनला भेट म्हणून दिले जाणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.
सोने चांदीच्या किमती बदलल्या सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी सोन्याला मिळतोय एवढा दर