राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, 28 जून 2024 रोजी शासनाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, त्यानुसार अनेक महिला योजनेच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागे लागलेल्या आहे, अनेक महिलांनी आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन किंवा ऑनलाईन अशा पद्धतीने भरलेली आहे, तसेच ज्या महिलांनी अर्ज पूर्ण केलेला नसेल अशा महिला आता अर्ज पूर्ण करत आहेत.
महिलांना अर्ज करत असताना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशाच अडचणींचा सामना महिलांना करावा लागू नये याकरिता शासनाच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेतील अटी शिथील केल्या जात आहे, तसेच पूर्वी शेतीची अट वयाची अट सुद्धा वाढवण्यात आलेली असून, आता नवीन शासनाच्या माध्यमातून सहा बदल करण्यात आलेले आहे.
अनेक महिलांकडे बँकेचे खाते नसल्याने काही महिलांकडे पोस्टाचे खाते होते त्यामुळे पोस्टाचे खाते चालणार की नाही अशा प्रकारचा प्रश्न पडलेला होता, परंतु आता नवीन नियमानुसार लाडकी बहीण योजनेसाठी पोस्टाचे खाते सुद्धा चालेल. योजने अंतर्गत लाभार्थी घेतलेल्या महिलांची यादी दर शनीवारी ग्रामस्थरीय समितीद्वारे वाचून दाखवली जाईल. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्राबाहेर झालेला असेल परंतु विवाह महाराष्ट्रामध्ये झालेला असेल म्हणजेच महाराष्ट्रातील स्थानिक पुरूशाशी विवाह केलेला असेल तर अर्ज करताना पुरुषाचे कागदपत्र जोडावे. तात्काळ विवाह नोंदणी करणे शक्य न झाल्यास रेशन कार्ड वरून व विवाह प्रमाणपत्रावर योजनेचा लाभ घेता येईल. ओटीपी चा कालावधी दहा मिनिटे एवढा करण्यात आलेला आहे, अशा प्रकारचे सहा बदल शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे.