मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत, आवश्यक कागदपत्रासह या ठिकाणी अर्ज करा | Ladaki Bahin Yojana 

अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली असून या योजनेचा जी आर सुध्धा काढण्यात आलेला आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना एक जुलैपासून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख शेवटी 15 जुलै आहे, म्हणजेच या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्या महिलांना माझी लाडकी बहिन अंतर्गत लाभ घ्यायचा असेल, अशा महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा. योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित काही आवश्यक अटी शर्ती पात्रता निकष तसेच आवश्यक कागदपत्रे ही संपूर्ण माहिती वाचून घ्यावी त्यानंतर अर्ज प्रक्रिया करावी. 

 

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना अर्ज करताना काही अटी व शर्ती समजून घेणे गरजेचे आहे, त्यामध्ये अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यानचे असावे, महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये, कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असू नये, महिलेच्या कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी. कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीवर नसावा, यासह इतरही विविध प्रकारच्या अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या असून यामध्ये महिला पात्र असावी.

 

योजनेच्या पात्रता निकषांमध्ये महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे, जन्माचा दाखला असावा, राज्यातील विवाहित घटस्फोटीत पर्यंत परीत्यक्त्या, निराधार अशा महिलांना योजनेचा लाभ घेता येईल, वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे, महिलेकडे बँकेचे पासबुक उपलब्ध असावे. अशाप्रकारे या अटी महिलेने वाचून घेतलेल्या असाव्यात.

 

योजनेच्या माध्यमातून महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे, रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल, अर्ज करत असताना त्यासोबत काही आवश्यक कागदपत्रे जोडावी त्यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, राज्यातील जन्म दाखला अथवा अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, योजनेच्या अटींचे पालन करण्याबाबतची हमीपत्र जोडावे कशाप्रकारे काही आवश्यक कागदपत्रे वरील प्रमाणे अर्ज करताना लाभार्थ्याकडे असावी.

योजना अर्ज pdf

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया करताना ही अर्ज प्रक्रिया महिलांना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत मध्ये तसेच सेतू महा-ई-सेवा केंद्र मध्ये सुद्धा अर्ज प्रक्रिया महिलांना पूर्ण करता येईल, व फेर तपासणी संपूर्ण करून लाभार्थ्यांची अंतिम यादी एक ऑगस्टला जाहीर होईल, 14 ऑगस्ट पासून महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल.

 

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे? नको असलेले सिम कार्ड बंद करायचे का? तर करा अगदी सोपी प्रोसेस 

Leave a Comment