मराठा समाजाच्या तरुणांसाठी उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी पन्नास लाखापर्यंतची लोन देण्यात येते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत योजना राबविण्यात येत असते. या योजनेतील मुख्य बाब म्हणजे या योजनेअंतर्गत असलेल्या व्याज परतावा सुद्धा सरकारच भरणार आहे त्यामुळे कर्जदार नागरिकाला व्याज परतावा भरण्याची गरजच उरणार नाही.
योजनेअंतर्गत समूहातून व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना 50 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेताना संबंधित उद्योगाचे प्रशिक्षण अर्जदारांनी घेतलेली असणे गरजेचे आहे. योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक बनवणे हा आहे.
योजने अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती 18 ते 50 वर्षे वयोगटातील असावा. तसेच अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्रातील मराठा समाजातील असावा. तसेच अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त नसावे आठ लाखापेक्षा जास्त असल्यास लाभ घेता येणार नाही.
अशाप्रकारे महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिकांना एक उत्तम प्रकारचा व्यवसाय चालू करण्यासाठीची उत्तम संधी आहे योजनेअंतर्गत लाभ घेऊन तब्बल पन्नास लाख रुपये पर्यंत चे कर्ज मराठा समाजातील व्यक्तीला मिळू शकते.
मराठा समाजासाठी असणाऱ्या या योजने संदर्भात संपूर्ण माहिती येथे पहा
7वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, 5793 जागांची जिल्हा न्यायालय भरती, ऑनलाईन अर्ज पद्धत