महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेसह, पिंक इ रिक्षा योजना चालू होणार, या महिलांना मिळणार लाभ | Mahila Yojana 

महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी गरिबांसाठी विविध प्रकारच्या योजनांची सुरुवात केली जात आहे, महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणी मध्ये आणल्या जात आहे, अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या योजनेनुसार राज्यात अन्नपूर्णा योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक महिलांना 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहे, परंतु यासंबंधीचा जीआर अजूनही काढण्यात आलेला नसून काही दिवसातच जी आर सुद्धा काढला जाईल.

 

एलपीजी गॅस चा वापर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला असल्याने याच्या वापरावर प्राधान्य दिले जात आहे, यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा खूप कमी होणार आहे, अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना दिला जाणार आहे, वार्षिक तीन सिलेंडर मोफत दिले जाईल व प्रत्येक वर्षी तीन सिलेंडर व्यतिरिक्त इतर खरेदी केले जाणारे सिलेंडर स्व खर्चाने खरेदी करावे लागणार आहे.

 

यासह महिलांसाठी पिंक रिक्षा योजना सुद्धा राबवली जाणार आहे, या संबंधित घोषणा करण्यात आलेली असून, महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी रिक्षा योजना महाराष्ट्रात राबवली जाणार आहे, यासह पिंक रिक्षा योजना चालू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजेच महिलांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येणार आहे, राज्यातील दहा हजार महिलांना म्हणजे 17 शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदी साठी अर्थसाहाय्य दिले जाईल. 80 कोटी रुपयांचा निधी सुद्धा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अशाप्रकारे राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारच्या योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे.

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना या चुका करू नका अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही 

Leave a Comment