मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, विधवा महिलांपासून ते ग्रामीण विकासासाठी चे मोठे निर्णय | Mantrimandal Nirnay 

मंडळ बैठकीमध्ये अनेक प्रकारचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामध्ये अगदी विधवा महिलांपासून ते ग्रामीण सेवेपर्यंतचे निर्णय यांचा समावेश आहे, अशे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ते निर्णय योग्य आहे कोणाला याचा लाभ मिळते यासंबंधीची माहिती खालील प्रमाणे करून घेण्याचा प्रयत्न करूयात, तसेच विधवा महिलांना जाहीर घोषणेनुसार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, व पैशाची बचत सुद्धा विधवा महिलांची निर्णयामुळे होणार आहे. 

 

जेव्हा एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू होतो व ती महिला विधवा होते अशा वेळेस त्या महिलेला मिळकतीवर वारस म्हणुन नोंदणी करायची असते अशावेळी 75 हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते, परंतु आता या शुल्का मध्ये कपात करण्यात आलेली असून, विधवा महिलांना वारस नोंदणी करताना एवढी मोठ्या संख्येने रक्कम न आकारता महिलेला फक्त दहा हजार रुपये एवढीच रक्कम आकारली जाईल.

 

वाहतुकी संबंधीचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानुसार हुडकोच्या माध्यमातून विरार ते अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडोरच्या भूसंपादनासाठी 22 हजार 250 कोटी, व 5 हजार 500 कोटी रुपये पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी कर्जाची मान्यता देण्यात आलेली आहे.

 

आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून 310 मिलियन डॉलर्सचे कर्ज मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, व या अंतर्गत, 3909 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती व सुधारणा केली जाईल.

 

राज्य शासनाच्या हिश्याची 1163 कोटी रुपये थेट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ला दिले जाईल, मुंबई मेट्रो 3 लवकर सुरू करण्यासाठी वितरण होईल, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शंभर खाटांचे रुग्णालय चालू करण्यासाठी चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन ला जमीन भाडे पट्ट्यावर द्याव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात सूट दिली आहे. अशाप्रकारे अत्यंत महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले असून याव्यतिरिक्त इतरही काही निर्णय महत्त्वाचे घेण्यात आलेले आहे.

 

या तारखे पर्यंत हे काम करा, अन्यथा गॅस कनेक्शन होईल बंद, गॅस कनेक्शन ची अंतिम मुदत 

Leave a Comment