पेपर प्लेट व्यवसाय कसा सुरू करायचा? | Paper Plate Business Information in Marathi

मित्रांनो या वेबसाईटच्या माध्यमातून आपण नवनवीन व्यवसाय कल्पना वेळोवेळी जाणून घेत असतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण अशाच एका कमी पैशांमध्ये सुरू करता येईल अशा व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेत आहोत. तो व्यवसाय म्हणजे पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय होय. मित्रांनो आजच्या काळात लग्न समारंभ असेल किंवा इतर कार्यक्रम जसे की बर्थडे पार्टी, आनंदाचे व दुःखाचे कार्यक्रम यामध्ये पेपर प्लेट मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहेत. या Paper Plate Business व्यवसायाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून हा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर आपण तो अत्यंत कमी पैशांमध्ये देखील सुरू करू शकतो. हा व्यवसाय जर आपण ग्राहकांना चांगल्या दर्जाची वस्तू उपलब्ध करून दिल्या तर जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळवून देऊ शकतो. तर चला जाणून घेऊया Paper Plate Business Information in Marathi बद्द्ल संपूर्ण माहिती.

 

पेपर प्लेट बनवण्याचा सुरुवातीला छोटा व्यवसाय सुरू करून आपण तो हळूहळू वाढवू शकतो. पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय सुरू करून सुरुवातीला आपल्या आजूबाजूच्या भागांमध्ये छोट्या-मोठ्या दुकानांना आपण बनवलेल्या पेपर प्लेट उपलब्ध करून देऊन जर त्यांची मागणी वाढल्यास त्या प्रमाणात हा व्यवसाय आपण हळूहळू वाढवू शकतो. पेपर प्लेट व्यवसाय कसा सुरू करायचा? Paper Plate Business बद्दल संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत.

 

पेपर प्लेट व्यवसाय सुरू करण्याकरिता लागणारा कच्चामाल आणि त्यांची किंमत किती?

मित्रांनो पेपर प्लेट चा व्यवसाय जर तुम्ही सुरू करणार असाल तर त्याकरिता लागणारे रॉ मटेरियल(paper plate raw material) हे चांगल्या दर्जाची वापरावी जेणेकरून तुमच्या वस्तू ग्राहकांना आवडल्या तर तुमच्या भागामध्ये तुमच्या वस्तूची मागणी वाढू शकते जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मागणी वाढली तर नफा सुद्धा नक्कीच वाढेल. आणि आपण आपल्या व्यवसाय मोठ्या स्तरावर नेऊ शकतो.Paper Plate Business

पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याकरिता आपल्याला खालील कच्चामाल आवश्यक आहे.Paper Plate Business raw material

1. मुद्रित पीई पेपर

मुद्रित पीई पेपर हे उच्च दर्जाचे वापरावे. या पेपरची किंमत ही प्रति किलो प्रमाणे तीस ते चाळीस रुपये पर्यंत आहे.

2. बॉटल रील

बॉटल रील सुद्धा उच्च दर्जाचे वापरावे, बॉटल रील हे चाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे उपलब्ध आहे

3. इतर आवश्यक छपाई उपकरणे

 

पेपर प्लेट बनविण्यासाठी येणारा खर्च Paper Plate making business cost

पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला या व्यवसायामध्ये कच्चामाल खरेदी करावा लागतो जसे की आपण वर दिलेला आहे त्याप्रमाणे. त्याचप्रमाणे पेपर प्लेट व्यवसाय करण्याकरिता तुम्हाला मशीन खरेदी करावी लागते. पेपर प्लेट चा व्यवसाय हा मशीन वर अवलंबून असतो. Paper plate business in india

पेपर प्लेटच्या व्यवसायामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या मशिनी खरेदी करता येते ती म्हणजे मॅन्युअल मशीन आणि दुसरी म्हणजे ऑटोमॅटिक मशीन. जर आपण मॅन्युअल मशीन खरेदी केल्यास येणारा खर्च कमी येतो मॅन्युअल मशीन साठी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो. जर आपण ऑटोमॅटिक मशीन खरेदी करणार असाल तर 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्याचप्रमाणे वेळोवेळी तुम्हाला कच्चामाल खरेदी करावा लागतो. कच्च्या मालाचा खर्च आपण बनवणार असणाऱ्या वस्तू नुसार येतो तर मशीन चा खर्च हा तुम्हाला एकच वेळ करावा लागतो. Paper plate making business idea

 

पेपर प्लेट व्यवसायामध्ये मशीनची आवश्यकता :-

मित्रांनो जर आपल्याला पेपर प्लेट बनवण्याचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला Paper Plate making machine ही खरेदी करावी लागते. पेपर प्लेट बनवण्याच्या व्यवसायातील बरेचसे कामेही मशीनवर अवलंबून आहेत. तुम्हाला रॉ मटेरियल खरेदी करून उर्वरित कामे मशीनवर करायची असतात. पेपर प्लेटच्या व्यवसायामध्ये पेपर प्लेट बनवण्याची मशीन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे ती म्हणजे मॅन्युअल ऑपरेट करता येणारी मशीन आणि स्वयंचलित ऑपरेट होणारी मशीन. या दोन पैकी कोणतीही मशीन आपण खरेदी करू शकतो. जर तुमच्याकडे सुरुवातीला प्रारंभिक भांडवल जास्त उपलब्ध नसेल तर आपण मॅन्युअल ऑपरेट करता येणारी मशीन खरेदी करू शकतो paper plate making machine price तुम्हाला 20000 रुपयांपर्यंत पडेल. चांगल्या दर्जाची मशीन वीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल. तसेच स्वयंचलित ऑपरेट होणारी मशीन जर खरेदी करायची असेल तर paper plate making machine price तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत मिळून जाईल. Paper plate making business idea in Marathi

सिंगल डाय मशीन आणि डबल डाय पेपर प्लेट मेकर मशीन यापैकी कोणतीही एक मशीन खरेदी करून तुम्ही तुमचा पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.

 

पेपर प्लेट कशा बनवायच्या? Paper Plate making process

मित्रांनो आता तुम्ही पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला असेल तर पेपर प्लेट कशा बनवायचे हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता पण पेपर प्लेट कशी बनवायची याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. paper plate business at home

1. प्रथमता तुम्हाला ज्या आकाराच्या पेपर प्लेट बनवायच्या आहेत त्या आकाराच्या कागद कापून घ्यायचा आहे.

2. पेपरचा आकार जास्त घेऊ नये जेणेकरून पेपर प्लेटच्या आकार बदलून ते चांगले दिसणार नाही. आता मॅन्युअल मशीन ची मोटर तुम्हाला चालू करायची आहे.

3. तुम्ही जो कागद कापलेला आहे तो आता डायच्या खाली दिलेल्या ठिकाणी ठेवावा. एक मशीन एका वेळेस डायच्या अकरा बाजूला अकरा पेपर भरू शकते.

4. एका मशीनला दोन डायस असतात आणि दोन डायस मध्ये आपण एका वेळेस 22 पेपर बनवू शकतो.

5. आता मशीनला ठेवण्यात आलेली हँड लिव्हर ही टाकल्यावर मशीनचे दोन्ही डायस खाली येतात आणि तुम्ही ठेवलेल्या कागदावर पडतात त्यानंतर प्लेटची रचना तयार होते.

6. सुरुवातीला पेपर बनवण्याच्या मशीन वर 22 पेपरच्या आकाराचे कागद ठेवून नंतर त्यावर डायस खाली पाडून एका वेळेस 22 प्लेट बनवण्यात येत असतात.

 

पेपर प्लेट बनवण्याच्या व्यवसायाचा परवाना तसेच नोंदणी करावी लागते का? Paper Plate making business registration process

मित्रांनो आपण तयार करत असलेल्या कोणत्याही व्यवसायाची नोंदणी शासन दरबारी करू शकतो. बऱ्याच व्यवसायाचा परवाना काढून आपल्याला व्यवसाय सुरू करावा लागत असतो. पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय (paper plate making business)हा एक खूप फायदेशीर व्यवसाय आहे. पेपर बनवण्याच्या व्यवसायात सुरुवातीला मशीन करिताच खर्च येतो त्यानंतर अत्यंत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा आपण कमवू शकतो त्यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या स्तरावर न्यायचा असेल आणि स्वतःचा एक ब्रँड तयार करायचा असेल तर शासन दरबारी याची नोंदणी करून घ्यावी तसेच विविध परवाने काढून घ्यावे. जेणेकरून तुमचा व्यवसाय सरकारच्या नियमानुसार त्यांच्याकडे नोंदणी राहील. याकरिता तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला त्या ठिकाणच्या स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी. त्याचप्रमाणे व्यवसायाची नोंदणी केल्यास आपल्याला आपल्या व्यवसायाचा ब्रँड बनवण्याकरिता सोपे जाईल. जर आपल्या व्यवसाय हा नोंदणीकृत असल्यास आपल्याला कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळू शकते. आतापर्यंत आपण पेपर प्लेट बनवण्याच्या व्यवसायाकरिता लागणारी सर्व यंत्र सामग्री तसेच कच्चामाल यांची माहिती जाणून घेतलेली आहे आता आपण पेपर प्लेटच्या व्यवसायात पेपर प्लेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची पॅकेजिंग करावी लागते याबद्दल माहिती जाणून घेऊया.

हे नक्की वाचा : dairy farming व्यवसाय कसा सुरू कारायचा?

पेपर प्लेट ची पॅकेजिंग कशी करायची? Paper plate business in Marathi

पेपर प्लेट ची पॅकेजिंग करण्याकरिता तुम्ही बाजारातून पॅकेजिंग मटेरियल ऑर्डर देऊ शकतात. पेपर प्लेटच्या एका पॅक मध्ये तुम्ही 25, 50 तसेच 75 व 100 याप्रमाणे प्लेट्स ठेवू शकतात. आणि पेपर प्लेटच्या या बॉक्सची किंमत तुमच्या येणाऱ्या खर्चामध्ये तुमचे मार्जिन ऍड करून ठेवू शकतात. Paper plate business in Marathi

 

पेपर प्लेट व्यवसायाची मार्केटिंग? Marketing a paper plate business?

मित्रांनो पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय(paper plate business idea in Marathi) तुम्ही सुरू केल्यानंतर तुमच्या जवळपासच्या किराणा दुकानदार यांच्याकडे तसेच मोठ्या स्टोअर मध्ये त्याची जाहिरात करा किंवा ते प्रॉडक्ट त्यांना विकायला द्या. किंवा स्वतःचे एखादे छोटेसे पेपर प्लेट विकणारे दुकान सुद्धा तुम्ही टाकू शकतात. हळूहळू ग्राहकांची मागणी वाढल्यानंतर दुकानदार तुम्हाला स्वतः कॉल करून तुमच्या पेपर प्लेट मागवून घेतील. तसेच तुम्ही पेपर प्लेटची मार्केटिंग करण्याकरिता खेड्यापाड्यांमध्ये जाऊन किराणा दुकान पर्यंत ह्या वस्तू पोहोचवू शकतात.

पेपर प्लेट व्यवसाय नफा मार्जिन paper plate business profit margin

पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय करून आपण 15% ते 30% पर्यंत नफा मिळवू शकतो. जर आपण बनविलेल्या पेपर प्लेट ला बाजारात मागणी असेल तर होणारा नफा सुद्धा तेवढ्याच प्रमाणात जास्त मिळतो. सुरुवातीला नफा कमी असतो. परंतु नंतर नफ्याचे प्रमाण वाढते.

video:

पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय संदर्भातील ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण व्यवसाय विषयक माहिती करिता या वेबसाइट वर भेट देत रहा.

Leave a Comment