येत्या काही तासात राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, या भागात झाला ढगफुटी सदृश्य पाऊस | Pavsachi Shakyata 

मागील काही तासांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाने सुरुवात केलेली आहे, राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत असून हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून अजूनही काही तास राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे, देण्यात आलेल्या अंदाजानुसार येणारे तीन ते चार तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण या तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार अति जोरदार पाऊस पडू शकतो. 

 

रायगड, ठाणे, मुंबई या भागांमध्ये हवामान विभागांने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, तर मुंबई या ठिकाणी तब्बल तीनशे मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे, म्हणजेच एक प्रकारे पावसाने रेकॉर्ड तोडलेला आहे, तसेच येणाऱ्या काही तासातच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणारा असून शक्यतो पाऊसही होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे, त्यामुळे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

 

हवामान विभागाच्या माध्यमातून कोकण, मुंबई या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे, तसेच पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी बाहेर पडू लागलेले आहे म्हणजेच धरणात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झालेली आहे. अशाप्रकारे हवामान विभागाच्या माध्यमातून एक प्रकारे हवामान अंदाज राज्याच्या विविध भागांमध्ये वर्तवलेला आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पावसाचे अंदाजानुसार शेतीच्या कामांमध्ये नियोजन करणे फायदेशीर ठरेल.

 

मागील काही दिवसांमध्ये मात्र राज्यातील विविध भागांमध्ये कोरडे वातावरण निर्माण झालेले होते व पाऊस पडत नसल्याने शेतकरी मात्र चिंतीत झालेला होता, परंतु आता राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली असल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, व त्यानुसार पावसामुळे अनेक प्रकारची कामे शेतकरी पूर्ण करू लागलेला आहे.

 

मुला मुलींना मिळणार अनुदानावर सायकल वाटप, अर्ज प्रक्रिया सुरू लगेच या ठिकाणी अर्ज करा 

Leave a Comment