सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी खरीप हंगाम 2023 मध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा मध्ये सहभाग नोंदवलेला होता, एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात येत असल्याने 2023 च्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यात पिक विमा योजनेत सहभाग नोंदवला, तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक प्रकारे पिक विमा मिळणे गरजेचे होते व सातारा जिल्ह्यासाठी दोन लाख शेतकऱ्यांचा 115 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप सुद्धा सुरू झालेले आहे.
दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सातारा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी काही वैयक्तिक क्लेम केलेले होते, तर काही अधिसूचना सुद्धा काढण्यात आलेल्या होत्या, सातारा जिल्ह्यामध्ये यापूर्वी कोणत्याही प्रकारचा एवढा मोठ्या प्रमाणात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता परंतु 2023 च्या खरीप हंगामामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला होता, व दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आता पिक विमा मंजूर झालेला असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे वाटप चालू झालेले असून, अनेक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी पिक विमा भरणाऱ्याची संख्या कमी असल्याने दरवर्षी पीक विम्याची रक्कम सुद्धा कमी मिळत होती, परंतु खरीप हंगाम 2023 च्या पिक विमा साठीची रक्कम ही 115 कोटी रुपये एवढी मोठ्या प्रमाणात देण्यात येत असून योजनेअंतर्गत यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, कारण यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने शेती पिकाचे पावसामुळे नुकसान होऊ शकते, अशा स्थितीशेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदवल्याने शेती पिकाला संरक्षण मिळेल.
सोन्याच्या दरासह चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने चांदीचे दर एवढ्या रुपयांनी वाढले