पी एम किसान योजनेअंतर्गत 6 हजारा ऐवजी 8000 मिळणार?, निर्मला सीतारामन यांची मागणी | PM Kisan Yojana 

देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत 2019 मध्ये पीएम किसान योजना चालू करण्यात आलेली होती, या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येत आहे परंतु ही 6000 रुपयांची रक्कम आता वाढवून आठ हजार रुपये तरी करावी अशा प्रकारची मागणी सितारामन यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र असून आत्तापर्यंत 17 हप्त्यांचे वितरण पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी अंतर्गत जमा करण्यात आलेले आहे. 

 

पीएम किसान योजनेअंतर्गत फक्त शेतकऱ्यांनाच लाभ दिला जातो व मागील काही दिवसांमध्ये अनेक शेतकरी पात्र असून सुद्धा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार होते कारण त्यांनी आधार लिंक केवायसी करणे यासह इतरही काही प्रक्रिया पूर्ण न केल्याने ते अपात्र ठरत होते, परंतु मागील काही काळात शासनाच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आलेली होती व त्यामुळे मधून अनेक शेतकऱ्यांच्या चुका झालेल्या होत्या, अटीचे पालन करण्यात आले नव्हते ते पूर्ण केलेले असून अनेक शेतकरी योजनेस पात्र ठरलेले आहेत व योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत.

 

पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजाराऐवजी 8000 रुपये एवढी रक्कम देण्यात यावी अशा प्रकारची मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये केलेली होती परंतु ही मागणी सतरावा हप्त्याचे वितरण होण्यापूर्वीच केलेली असल्याने त्याबाबत कोणत्याही प्रकारे रक्कम वाढवली गेलेली नाही, परंतु येणाऱ्या काळात ही रक्कम वाढवली जाणार का? व वाढवली गेली तर यात शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होणार आहे.

 

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आज पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंतचा लाभ 

Leave a Comment