शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय मागील काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेला होता व त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून म्हणजेच पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा दिला जाणार आहे, यापूर्वी मात्र पांढऱ्या रेशन कार्डधारकांना आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जात नव्हता, यामध्ये केवळ पिवळे रेशन कार्ड धारक व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबीयांना लाभ दिला जात होता, परंतु आता आज पासूनच पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार दिला जाणार आहे.
शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला होता तेव्हाच पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुचित करण्यात आलेले होते की त्यांनी रेशन कार्ड आधार कार्ड शी लिंक करून आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे व त्यांना एक प्रकारची मदत सुद्धा आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी केली जाणार होती, त्यामुळे आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून लाभ दिला जाईल, 1356 आजारांवर उपचार जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहे तसेच आतापर्यंत आयुष्यमान कार्ड च्या माध्यमातून मोठ्या संख्येने अनेक जणांना लाभ दिला गेलेला असून मोठ्या बिमाऱ्यांचा इलाज केला गेलेला आहे.
पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लिंक करून घ्यावे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आता पांढऱ्या रेशन कार्डधारकांना सुद्धा मोठ मोठ्या बिमाऱ्यावरील मोफत उपचार मिळेल म्हणजेच पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत लाभ त्यांना दिला जाणार आहे, तसेच विविध प्रकारच्या आजारांवर निदान लावले जाईल व याचा मोफत लाभ मिळणार आहे.
यावर्षी मराठवाडा पाऊस नसण्याचे हे आहे मुख्य कारण, जून संपला तरी पावसाची प्रतीक्षा कायमच