जिओ नंतर आता एअरटेलने रिचार्ज वाढवले, 3 जुलैपासून राहतील एअरटेल रिचार्जचे हे नवीन दर | Richarg 

अगदी गेल्या आठ दिवसांमध्ये रिलायन्स जिओने आपल्या प्लॅन्सच्या म्हणजेच रिचार्ज किमती वाढवण्याची घोषणा केलेली होती, व त्या किमती आता लागू झालेल्या आहेत व यानंतरच आत्ताची मोबाईल वापरकर्त्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी म्हणजे आता रिलायन्स जिओ नंतर एअरटेल ने सुद्धा रिचार्ज चे दर वाढवलेले आहे, त्यामुळे आता जिओ नंतर एअरटेल ने रिचार्ज वाढवल्याने ग्राहकांकडे जास्त पर्याय उरलेला नसून जास्त किंमत देऊन चार्ज करून घ्यावा लागणार. 

 

एअरटेल ने वाढवलेल्या दरामध्ये जवळपास दहा ते 21 टक्क्यांनी वाढ केलेली आहे व त्यांचे हे नवीन प्लॅन्स आता 3 जुलै 2024 पासून लागू होणार आहे, म्हणजेच तीन जुलैपासून ग्राहकांना नवीन दरानुसार रिचार्ज करावा लागेल, त्यामुळे पूर्वी मिळत असलेले रिचार्ज, आता किती रुपयांना मिळेल? हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न खालील प्रमाणे करूयात, एअरटेल ने नेटवर्क तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी व गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी दर वाढवणे आवश्यक असल्याने हे दर वाढवलेले आहे.

 

एअरटेल रिचार्ज पूर्वीचे दर व आताचे दर काय आहेत हे समजल्यानंतर ग्राहकांना अगदी चांगल्या प्रकारे जास्त पैसे मोजावे लागणार आहे, त्यामुळे अर्थातच ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, 28 दिवसांची वैधता असलेला 265 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 299 रुपये मोजावे लागणार आहे, 299 रुपयाच्या प्लॅनसाठी 349 रुपये 28 दिवसाच्या वैधते करिता प्लॅन साठी मोजावे लागतील. 455 च्या प्लॅन ची किंमत आता वाढवून 509 रुपये करण्यात आलेली आहे, अशाप्रकारे जिओ नंतर आता एअरटेल ने सुद्धा आपले रिचार्ज चे दर वाढवलेले असून वाढवलेल्या दरानुसार ग्राहकांना रिचार्ज करावे लागणार आहे.

 

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे? नको असलेले सिम कार्ड बंद करायचे का? तर करा अगदी सोपी प्रोसेस

Leave a Comment