तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे? नको असलेले सिम कार्ड बंद करायचे का? तर करा अगदी सोपी प्रोसेस | Sim card 

आजकाल बघायचे झाल्यास मोठ्या प्रमाणे जवळपास सर्वांकडेच मोबाईल उपलब्ध झालेला आहे, व त्या मोबाईल मध्ये सिम कार्ड सुद्धा आहे काही नागरिक एका मोबाईल मध्ये दोन सिम कार्ड वापरतात तर त्यांच्या नावावर नेमके किती सिम कार्ड आहे, त्यांनाही माहित नसतील त्यामुळे तुमच्या आधार कार्डवर घेण्यात आलेले म्हणजे तुमच्या नावावर सिम कार्ड किती आहे, तसेच नको असलेल्या सिम कार्ड ला बंद कशी करायचे तसेच तुमच्या सिम कार्डचा काही गैरवापर केला जात आहे का? याबद्दल संपूर्ण माहिती करून घेण्याचा प्रयत्न खालील प्रमाणे करूया.

शासनाच्या माध्यमातून एक नवीनच पोर्टल चालू करण्यात आलेले आहे त्या पोर्टल चे नाव संचारसाथी असून त्याच्या माध्यमातून आपल्या नावावर किती मोबाईल क्रमांक रजिस्टर आहेत तसेच नको असेल मोबाईल क्रमांक कसा बंद करायचा हे बघूया. त्यासाठी सर्वप्रथम गुगल वर जाऊन संचारसाठी टाकून पोर्टल ओपन करा. त्यामध्ये नो युवर मोबाईल कनेक्शन या ऑप्शन वर क्लिक करावे.

त्यानंतर एक पेज ओपन होईल तुमच्या आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे, हे जाणून घेऊन तो मोबाईल क्रमांक पुढील बॉक्समध्ये एंटर करावा लागेल, त्यानंतर कॅपच्या कोडे जशास तसा टाकावा, त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठविला जाईल तो ओटीपी बॉक्समध्ये जशास तसा एंटर करा. त्यानंतर लॉगीन वरती क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेले, म्हणजेच रजिस्टर असलेले मोबाईल क्रमांक दाखवले जाईल, त्यामध्ये तुमचा चालू मोबाईल क्रमांक वगळता इतर मोबाईल क्रमांक तुम्हाला रजिस्टर ठेवायचे नसेल तर त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक बंद करण्याची रिक्वेस्ट दिली जाऊ शकते, अशा पद्धतीने तुमच्या आधार कार्डशी रजिस्टर असलेले मोबाईल क्रमांक अगदी सहजरीत्या बघता येईल.

 

या तारखे पर्यंत हे काम करा, अन्यथा गॅस कनेक्शन होईल बंद, गॅस कनेक्शन ची अंतिम मुदत 

Leave a Comment