नववी नापास मराठी तरुण आज आहे उद्योजक; आनंद बनसोडे सक्सेस स्टोरी | Success Story of Anand Bansode

मित्रांनो आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर जीवनात आलेल्या सर्व संकटावर मात करून एक मराठी तरुण आज उद्योजक बनला आहे. त्या तरुणाने त्याच्या जीवनामध्ये अनेक जण उतार पाहिलेले असून उध्वस्त झाल्यासारखं वाटणारं आयुष्य त्याने कठोर परिश्रम करून सफल बनवलं आहे. उद्योजक आनंद बनसोडे यांची सक्सेस स्टोरी(Success Story of Anand Bansode) आता आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो उद्योजक आनंद बनसोडे यांनी जगभरातील सात शिखर यांची सर केलेली आहे. एवढेच नाही तर आनंद बनसोडे हा युवक एक यशस्वी भारतीय गिर्यारोहक तसेच बिजनेस कोच, रेकॉर्ड होल्डर, सक्सेस ट्रेनर व लेखक आहे. या युवकाला त्यांच्या डॉक्टरांनी तू गाडी चालू शकणार नाही त्याचप्रमाणे तू ट्रेकिंगही करू शकत नाहीत तुला वस्तू उचलण्याकरिता दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल असे सांगितले होते परंतु या सर्व संकटावर मात करत त्यांनी अनेक गोष्टीत सफलता मिळवलेली आहे. Anand Bansode Success Story

 

हा तरुण नवीन नापास असून सुद्धा आज एक यशस्वी उद्योजक बनला आहे. वर्ष 2015 मध्ये आनंद बनसोडे यांना मणक्याचा विकार झालेला होता त्यामुळे त्यांना हालचाल करण्यास त्रास होत होता. त्यामुळे तो अंथरुणाला खिळून बसला होता. परंतु तो या परिस्थितीवर मात करत पुढील तीन वर्षात त्याच्या बिजनेस मध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करून दाखवली आहे.

 

 

आनंद बनसोडे माहिती Anand Bansode Information in Marathi

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील युवा उद्योजक आनंद बनसोडे(Udojak Anand Bansode) हे कोण आहे हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजे. तर चला जाणून घेऊया आनंद बनसोडे यांच्या बद्दल थोडक्यात माहिती.

 

लहानपणी आनंद हा खूप लाजरा मुलगा होता. तो अभ्यासातही हुशार नव्हता त्यामुळे तो नवीन नापास झाला होता. त्याला त्याचे नाव घेण्याकरिता प्रॅक्टिस करावी लागत होती. सुरुवातीला त्याची अशी परिस्थीती होती, परंतु त्यांनी या परिस्थीतीवर मात करत त्याच्या जीवनाचा काया पालट केलेला आहे. तू कधीच चालू शकणार नाही असे डॉक्टरांनी म्हटल्यानंतर सुद्धा त्याच्या सर्वात मोठ्या विकनेसला त्यांनी सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी बनवून दाखवले. 19 मे 2012 ला त्यांनी माउंट एवरेस्ट ची सर केली.

 

आनंद बनसोडे यांचे वडील दोन चाकी गाड्यांची पंचर काढत होते. आणि त्यांची आई ही फक्त तिसरी शिकलेली होती. आनंद बनसोडे (Anand Bansode Udojak) यांचा कुटुंब अतिशय गरीब होतं. एका छोट्याशा झोपडीमध्ये आनंद बनसोडे यांचे कुटुंब राहत होतं. नववी मध्ये नापास झाल्यानंतर त्यांच्या आईने आनंदला पुन्हा शाळेत जाण्याची संधी दिली. नंतर तो दहावी पास झाला. त्यानंतर बारावीनंतर पीएचडी त्यांनी पूर्ण केली.

 

गरीब मुलांनी मोठी सपना पाहू नये असा समाजाचा विचार असला तरी सुद्धा त्याने माउंट एवरेस्ट ची सर करण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली अनेकदा त्याला या कार्याकरिता घरातून पळून जावे लागत होते या कार्याकरिता त्यांनी अनेक वेळा अपमान सुद्धा सहन केला. परंतु शेवटी जे शक्य नव्हते ते शक्य करून दाखवलेच. त्यांनी आतापर्यंत पाच पुस्तके लिहिली असून ते सध्या बिजनेस कोच व कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करत आहे.

लोकांचं मत तुमची रियालिटी बनू देऊ नका? तुमच्या मनाला जे वाटतं तेच करा. या बाबींवर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्या जीवनात अनेक क्षेत्रात यश मिळवले आहे.

 

आनंद बनसोडे व्यवसाय सक्सेस स्टोरी Anand Bansode Business Success Story

उद्योजक आनंद बनसोडे यांनी माउंट एवरेस्ट सर करण्याबरोबरच अनेक बाबींमध्ये आपले लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनी जगातील सात खंडातील सर्वोच्च सात शिखरांची चढाई केली. या शिखरांवर त्यांनी भारताचा झेंडा फडकला. त्यानंतर त्यांनी साहित्य क्षेत्रात पाऊल ठेवून अनेक पुस्तके लिहिली. आणि तो बिजनेस कोच तसेच कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करत आहे. 2018 मध्ये पुन्हा एव्हरेस्ट बेसकॅम्प व सह्याद्री मधील अनेक मोहिमा त्याने केल्या आहेत. तसेच नुकतेच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विचार मांडन्याची संधी त्याला उपलब्ध करून दिलेली आहे. Anand Bansode Business Success Story

हे नक्की वाचा : asian paints dealership कशी मिळवायची?

आनंद बनसोडे(Anand Bansode) यांचा प्रवास एका गरीब घराण्यातील झोपडीतून सुरू झाला आणि आता तो एक उद्योजक बनला आहे. 360 एक्सप्लोरर ही जागतिक दर्जाची टूर कंपनी तसेच ‘द लिमिटलेस यु’ या दोन कंपन्या आनंदने सुरू केलेल्या आहेत. आता तो तरुण उद्योजक बनला आहे. त्याच्या कंपन्या जगभरातील नागरिकांना टूर करून देत आहे त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात मार्गदर्शन करत आहेत. आनंद मोठ्या व्यवसायिकांना प्रशिक्षण देत आहेत. आनंद कडून शिक्षण घेतलेले विद्यार्थी संपूर्ण जगभरात आपली ख्याती मिळवत आहेत. आनंदात उद्योजकांना त्यांच्या आयुष्यात स्वप्नांना भरारी घेण्यास मदत करत आहे. तो पर्सनल ट्रेनर म्हणून काम करत आहे.

अशाप्रकारे Anand Bansode हा तरुण एका गरीब घरातून समोर येऊन अनेक क्षेत्रात आपले नाव कमवून मोठा उद्योजक बनला आहे. युवा उद्योजक आनंद बनसोडे यांच्या बद्दलची ही माहिती आनंद बनसोडे ची सक्सेस स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा अशाच महत्वपूर्ण सक्सेस स्टोरी करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment