तुरीच्या शेंड्याची या कालावधीत कापणी करा, उत्पादनात होणार भरगोस वाढ | Tur Shende Kapani 

यावर्षी तुरीला चांगला दर मिळालेला आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केलेली असून त्या तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ कशा पद्धतीने केली जाऊ शकते, याकडे सर्व शतकऱ्यांचे लक्ष लागून आहे, उत्पादनामध्ये जर वाढ करायची असेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच तुरीच्या लागवडीनंतर योग्य कालावधीमध्ये तुरीच्या शेंड्यांची कापणी म्हणजेच खुडनी करणे, अत्यंत महत्त्वाची बाब आहे कारण तुरीच्या शेंड्यांची कापणी केल्यानंतर उत्पादनात भरघोस प्रमाणात वाढ बघायला मिळू शकते. त्यामुळे शेंडे कापणीचा योग्य कालावधी कोणता व कापणी किती वेळेत करावी यासंबंधी संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना माहिती असावी. 

 

अनेक शेतकऱ्यांना तुरीच्या शेंड्यांची कापणी केल्याने उत्पादनात भर पडते ही बाब अजूनही माहित नाही आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना शेंडे खुडणीची बाब माहिती आहे, अशा शेतकऱ्यांनी योग्य कालावधी निवडणे गरजेचे आहे शेंड्याची कापणी केल्याने झाडाच्या फांद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, फांदी व पाने फुटण्यास सुद्धा मदत होते, शेंडा कापणी करत असताना शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घ्यावा जर अधिकच जास्त ढगाळ वातावरण असेल तर खुडणी थांबवावी मोकळे वातावरण असल्यास खुडणी शेंड्यांची करणे आवश्यक आहे.

 

पंधरा ते वीस दिवसा दरम्यान शेतकऱ्यांनी पहिली तुरीची कापणी करणे गरजेचे आहे, तसेच दुसरी कापणी ही साधारणतः फुले येण्यापूर्वी करणे आवश्यक आहे, अशा कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी तुरीच्या शेंड्यांची कापणी करावी तसेच कापणी केल्यानंतर त्यावर बुरशीनाशकाचा वापर करून फवारणी करावी, तसेच ढगाळ वातावरणामध्ये जर कोणी केली असेल तर मोठ्या प्रमाणात तुरीवर अळ्या आढळतात त्यामुळे फवारणी करणे गरजेचे असते. अशाप्रकारे तुरीची शेंडे कापणी करणे म्हणजेच साधारणता चांगल्या प्रमाणात उत्पादनात भर पाडणे होय.

 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बियाणे प्रक्रिया संचासाठी मिळणार 10 लाखांचे अनुदान लगेच या तारखेपर्यंत अर्ज करा

Leave a Comment