उद्योजक अशोक खाडे माहिती मराठी, 500 कोटींचे मालक सांगलीचे अशोक खाडे | Udyojak Ashok Khade Business Story

एकेकाळी अत्यंत गरिबी आणि अस्पृश्यता यांना सामोरे जाणारे खिशामध्ये 25 पैसेही नसणारे अशोक खाडे आज 500 कोटी रुपयांचे मालक आहेत. या ध्येयवेढ्या मराठी माणसाची बिझनेस स्टोरी आज आपण जाणून घेत आहोत. मराठमोळे सांगली चे सुपुत्र अशोक खाडे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर तसेच प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर व्यवसायामध्ये खूप मोठे नाव कमावले आहे. आज ते त्यांच्या कंपनीमध्ये 4500 लोकांना काम देत आहेत. तर चला जाणून घेऊया उद्योजक अशोक खाडे Udyojak Ashok Khade यांच्या बद्दल माहिती.

उद्योजक अशोक खाडे माहिती Udyojak Ashok Khade Information in Marathi

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले स्वतःचे भाग्य कसे बदलायच, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्योजक अशोक खाडे(Ashok Khade) होय. सुरुवातीला अशोक खाडे यांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत गरिबी पाहिलेली आहे. त्यानंतर त्यांनी प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर एक कंपनी स्थापन करून अनेक प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. आज त्यांच्या कंपनीमध्ये 4500 पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. Ashok Khade Mahiti Marathi

अशोक खाडे(Ashok Khade) हे मूळचे  सांगली जिल्ह्यातील आहे. अशोक खाडे हे अकरावी मध्ये असताना त्यांना परीक्षेच्या दरम्यान पेनची निब बदलण्याकरिता त्यांच्याकडे 4 आणे सुद्धा नव्हते. सुरुवातीला त्यांचे प्रतिकृती अत्यंत हलाखीची होती. अशोक खाडे यांच्या कुटुंबाला दोन वेळची जेवण करण्याकरिता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत होता. परंतु त्यांच्या आजच्या परिस्थितीचा विचार करता त्यांच्या विविध कंपन्यांमध्ये साडेचार हजार पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. त्यांच्या कंपनीचा जगभरामध्ये 500 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा व्यवसाय आहे.

उद्योजक अशोक खाडे सक्सेस स्टोरी Ashok Khade:-

सुरुवातीला खूप हालाखीची जीवन जगणारे अशोक खाडे हे सध्या सुप्रसिद्ध कंपनी दास ऑफशोर इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि एमडी आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. अशोक खाडे यांचा व्यवसाय बद्दल संघर्ष हा सत्तरच्या दशकामध्ये सुरू झाला. उद्योजक अशोक खाडे यांनी त्यांचे प्राथमिक म्हणजेच पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावांमध्येच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आठवीपासून ते अकरावी पर्यंतचे शिक्षण सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी घेतले.

त्यांचे कुटुंब हे वारकरी संप्रदायाला मानणारे होते. सुरुवातीला अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता कुर्ल्यामध्ये एका चाळीत खानावळ सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी एफवाय सायन्सचं शिक्षण पूर्ण केलं होतं. अशोक खाडे यांचे स्वप्न डॉक्टर होण्याचे होते परंतु घरची परिस्थिती नसल्यामुळे ते डॉक्टर होऊ शकले नाही. अशोक खाडे यांचे वडील मुंबईमध्ये मोच्याचे काम करायचे. त्यांची आई शेतामध्ये मजुरी करायची. त्यानंतर अशोक खाडे यांचे मोठे भाऊ दत्तात्रय यांना माझगाव डॉकयार्ड मध्ये वेल्डिंग अप्रेंटिस म्हणून नोकरी लागली होती. त्यानंतर अशोक खाडे यांनी सुद्धा त्याच ठिकाणी हँडमॅन म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा कोर्स केला होता. अशोक खाडे यांनी जहाज डिझाईनिंग चे प्रशिक्षण सुद्धा घेतले होते.

अशोक खाडे यांनी माझगाव डॉकमध्ये चार वर्षे नोकरी केली त्यानंतर ते जर्मनीला गेले त्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण घेतले परंतु त्या ठिकाणी काम करत असणार आहे तर लोकांना त्यांच्यापेक्षा बारापट जास्त पगार मिळत होता. त्यामुळे त्यांनी नोकरी न करण्याचे ठरवले, आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. अशोक खाडे यांनी नवीन व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे फक्त दहा हजार रुपये होते. सुरुवातीला त्यांच्याकडे व्यवसाय करण्याकरिता जागाही नव्हती तसेच कार्यालय ही नव्हते त्यांनी त्यांचा व्यवसाय एका टेबलावर सुरू केला.

पिठाची गिरणी व्यवसाय कसा सुरू करायचा? Flour mill business in Marathi

उद्योजक अशोक खाडे यांना त्यांच्या वडिलांनी एक वाक्य सांगितले होते जे त्यांनी कायम स्मरण ठेवले आहे. ते म्हणजे अशोक जे तुझं नेचर आहे तेच तुझं फ्युचर होणार आहे. अशोक खाडे यांनी त्यांच्या तीन भावांचे पहिल्या अक्षराचे नाव जोडून दास नावाची एक कंपनी सुरू केली. अशोक खाडे यांची तीन भाऊ म्हणजे दत्तात्रय, अशोक आणि सुरेश होय. सुरुवातीला त्यांच्या कंपनीने समुद्रातून तेल काढण्याचे प्लॅटफॉर्म म्हणून काम केले. त्यात त्यांच्या कंपनीला खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळाले होते. आणि आज त्यांच्या अनेक कंपन्या जगभर कार्यरत आहेत. तसेच त्यांच्या कंपन्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त प्रकल्प पूर्ण केलेले आहेत.

अशोक खाडे(Ashok Khade) यांच्या दास ऑफशोर या कंपनीने ओएनजीसी, एल अँड टी, एस्सार आणि भेल यांसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांसोबत काम केलेले आहे. उद्योजक अशोक खाडे यांनी त्यांच्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मदर तेरेसा यांच्याकडून प्रेरणा घेत हा प्रवास पूर्ण केलेला आहे. अशोक खाडे(Ashok Khade) एक मराठी व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाकरिता एक उत्तम उदाहरण आहे. अशोक खाडे यांच्या संघर्षाची कहाणी स्वीडनमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात जन्मलेले अशोक खाडे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचा अभिमान बनले आहे.

उद्योजक अशोक खाडे (Udyojak Ashok Khade)यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेल आहे. घरच्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करत त्यांनी खूप मोठा व्यवसायाचा प्रवास गाठला आहे. अशोक काळे यांच्या व्यवसायाबद्दलची ही सक्सेस स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो. अशोक खाडे यांच्या बद्दलची माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment