उद्योजक विठ्ठल कामत माहिती 450 हॉटेल्सचे मालक | Udyojak Vithal Kamat Information Marathi

मित्रांनो आजच्या या स्टार्टअप स्टोरीज मध्ये मुंबईतील आपल्या महाराष्ट्र राज्यातील उद्योजक विठ्ठल कामत(Udojak Vithal Kamat) जे आज संपूर्ण जगभरात 450 हॉटेलचे मालक आहेत. मुंबईतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज संपूर्ण जगभरामध्ये व्यापलेला आहे. ते आज जगभरातील प्रसिद्ध हॉटेल मालक आहे. उद्योजक विठ्ठल कामत यांच्या सक्सेस स्टोरी बद्दल त्यांच्याबद्दल Udyojak Vithal Kamat Information Marathi विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

उद्योजक विठ्ठल कामत माहिती Udojak Vithal Kamat Mahiti Marathi

मित्रांनो आजच्या काळात कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये जोखीम असतेच. कोणताही व्यवसाय सुरुवातीला छोटा असतो. तुमचा एखादा छोटा व्यवसाय असेल किंवा तुम्ही एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल. किंवा तुमचा एखादा वडिलोपार्जित व्यवसाय असेल. तो व्यवसाय तुम्हाला मोठ्या जोखमी ने तसेच प्रबळ इच्छाशक्तीने चालवावा लागतो. परंतु आपल्याला आपल्या पारंपरिक व्यवसायातून बाहेर निघून काहीतरी नवीन करण्याचा विचार करायला पाहिजे. आपला व्यवसाय आधुनिक पद्धतीने करायला पाहिजे. असेच एक विलक्षण स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय उद्योजक विठ्ठल कामत यांनी पाहिले होते. त्यांचे वडील हे हॉटेल व्यवसाय करत होते, त्यांनी त्या व्यवसायामध्ये प्रवेश करतात त्यांची व्यवसाय करण्याची पद्धत अशी होती की ते आता जगभरात 450 हॉटेल्स चालवत आहेत.

 

विठ्ठल कामत(Vithal Kamat) यांनी हॉटेल व्यवसायामध्ये पाऊल ठेवलं आणि आता ते जगभरातील सुप्रसिद्ध हॉटेल चालक बनले आहे. विठ्ठल कामत हे कामत हॉटेल्स ग्रुप लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. विठ्ठल कामत हे नाव ऐकताच आपल्याला मराठी माणसाचा अभिमान वाटतो. मुंबईमध्ये असणारा हॉटेल व्यवसाय जास्त करून दक्षिणात्य व्यक्तींच्या हातामध्ये गेला होता. मुंबईतील हॉटेल व्यवसायावर त्या लोकांनी एकाधिकार जमवला होता. त्यावेळेस मुंबईकर विठ्ठल कामत यांनी वडिलांचा छोटासा असलेला हॉटेलचा व्यवसाय संपूर्ण जगभरात विस्तारवला. विठ्ठल कामत हे आज जगभरात अनेक हॉटेल सांभाळत असून ते एक सुप्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आहे.

 

 

उद्योजक विठ्ठल कामत सक्सेस स्टोरी Business Story of Vitthal Kamat

आता आपण मराठी उद्योजक विठ्ठल कामत(Vithal Kamat) यांच्या बद्दल त्यांनी सुरू केलेल्या हॉटेल व्यवसायाबद्दल एकंदरीतच त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया.

विठ्ठल कामत(Vithal Kamat)हे मुंबईमध्ये ग्रॅंट रोड येथे राहत होते. विठ्ठल कामत यांचा जन्म कामत कुटुंबामध्ये झाला होता. विठ्ठल कामत(Vithal Kamat)यांचे वडील हॉटेल व्यवसाय करत होते. परंतु मुंबईमध्ये हॉटेल व्यवसायात दक्षिणात्य लोकांचे वर्चस्व असल्यामुळे विठ्ठल कामत यांच्या वडिलांचा व्यवसाय तेवढा चालत नव्हता. उद्योजक विठ्ठल कामत यांच्या वडिलांचे नाव व्यंकटेश असे होते. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. कष्ट करून पोट भरणे यावरच त्यांनी भर दिला होता.

विठ्ठल कामत यांचे वडील आणि त्यांची आई यांचे असे म्हणणे होते की, विठ्ठल कामत यांनी वडिलांचा व्यवसाय वाढवावा. व त्यांच्या वडिलांची व्यवसायाची परंपरा पुढे ठेवून वडिलोपार्जित व्यवसाय करावा. परंतु विठ्ठल कामत यांना हॉटेल व्यवसाय थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा होता. विठ्ठल कामत यांना त्यांची हॉटेल हे जगप्रसिद्ध करायचे होते. त्यांना हॉटेल व्यवसायामध्ये नावलौकिक मिळवायचे होते. त्यामुळे त्यांनी हॉटेल व्यवसाय वेगळ्या पद्धतीने करण्याची ठरवले. हॉटेल व्यवसायामध्ये असणारे बारकावे, हॉटेल व्यवसाय मध्ये काम करण्याच्या वेगळ्या पद्धती या त्यांनी सुरुवातीला शिकून घेतल्या. Vithal Kamat Mahiti Marathi, Udojak Vithal Kamat Information in Marathi

 

विठ्ठल कामत(Vithal Kamat) यांची शिक्षण इंजीनियरिंग मध्ये झाले होते. त्यांनी आता त्यांच्या वडिलांचा हॉटेल व्यवसाय स्वतःच्या हातात घेतला. हॉटेल व्यवसायातील थोडे फार ज्ञान मिळवल्यानंतर त्यांनी वडिलां द्वारे चालवण्यात येणारे ‘सत्कार’ हे हॉटेल चालवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना हा व्यवसाय जगप्रसिद्ध करायचा असल्यामुळे तो व्यवसाय त्यांनी प्रॅक्टिकल ज्ञान घेऊन नंतर पुढे जाण्याचे ठरवले होते. त्याकरिता त्यांनी लंडनला जाण्याचे ठरवले लंडन मधल्या हॉटेलमध्ये त्यांनी कुक म्हणून काही दिवस काम केले. हॉटेल व्यवसायातील बारकावे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लक्षात घेतले. जगभरातील हॉटेलच्या पद्धती त्यांनी लक्षात घेतल्या.

 

हॉटेल व्यवसाय बद्दल ज्ञान मिळवण्यासाठी लंडन येथे गेल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की हॉटेल हा व्यवसाय टीमवर्क ने केला तर तो व्यवसाय मोठ्या स्तरावर जाऊ शकतो. टीम कशी उभी करायची? हॉटेलच्या कामांची व्यवस्थापन कसे करायचे? हे विठ्ठल कामत यांनी कोणत्याही डिग्री किंवा कोर्सच्या साह्याने न शिकता, जगभरातील वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये काम करून प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकले होते.

 

आता विठ्ठल कामत(Vitthal Kamat) संपूर्ण नॉलेज घेऊन पुन्हा भारत देशामध्ये परतले होते. आता त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरिता सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या इको-टेल फाइव स्टार हॉटेल्सची चैन सुरु केली होती. तेवढ्यातच मुंबईतील एअरपोर्टच्या जवळ असलेले ‘प्लाझ्मा’ हॉटेल विकण्याकरिता उपलब्ध असल्याची बातमी त्यांच्याकडे आली होती. त्यांनी ते हॉटेल खरेदी करण्याचा प्रयत्न केला; त्यांच्याकडे ते हॉटेल घेणे इतके पैसे नव्हते, तरीसुद्धा त्यांनी पैशाची जमवाजमव करुन शेवटी ते हॉटेल खरेदी केलेच. आणि त्यांनी त्यानंतर त्याच जागेवर देशातील पहिले इको-टेल फाइव स्टार हॉटेल्स सुरु केले. त्यांनी त्यांच्या नवीन हॉटेलचे नाव आता ‘ऑर्किड’ हॉटेल असे ठेवले होते. आता त्यांचे मोठे हॉटेल उभे करण्याचे स्वप्न पूर्ण झालेले होते. एक मराठी हॉटेल व्यवसाय मोठ्या स्तरापर्यंत त्यांचा हॉटेल व्यवसाय सुरू करू शकतो, हे आता सिद्ध झाले होते.

सीएनजी पंप डीलरशिप कशी मिळवायची? How to get CNG Pump Dealership

Vithal Kamat यानी आता हॉटेल व्यवसायाच्या फ्रेंचाईजी देऊन त्यांच्या हॉटेल व्यवसायाची वाढ करण्यात सुरुवात केली. हळूहळू त्यांनी त्यांचा हॉटेल व्यवसाय वाढवत नेला आणि आज त्यांची संपूर्ण जगभरात 450 पेक्षा जास्त ठिकाणी हॉटेल्स आहेत. संपूर्ण भारत देशातील तसेच जगभरातील त्यांच्या हॉटेल व्यवसायामुळे त्यांचे नाव सुप्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

 

त्यामुळे कोणत्याही मराठी माणसाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय छोटा आहे की मोठा याचा विचार न करता सुरुवातीला तो व्यवसाय आपण त्या व्यवसायाबद्दल संपूर्ण ज्ञान मिळवून सुरू केला पाहिजे. सर्व मराठी उद्योजकांसाठी विठ्ठल कामत हे नाव प्रेरणादायक आहे. उद्योजक विठ्ठल कामत (Vitthal Kamat)यांच्या व्यवसायाच्या सक्सेस स्टोरी बद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment