महाराष्ट्र विहीर अनुदान योजने अंतर्गत, विहिरीसाठी मिळवा 4 लाख रुपये अनुदान, आत्ताच अर्ज करा | Vihir Anudan Yojana Maharashtra

Vihir Anudan Yojana अंतर्गत शासनाकडून चार लाखापर्यंतचे अनुदान दिले जाते, या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना पण होणार आहे,शेतामध्ये आवश्यक असलेली Vihir आता या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा अर्ज कसा करायचा या योजनेचे पात्रता काय हे आपण पुढे बघणार आहोत.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत खूप चांगला फायदा मिळणार, त्यांच्या शेतामध्ये विहीर येऊ शकणार आहे.

शेतकऱ्यांना शेतामध्ये विहीर असणे आवश्यक असते, विहिरी खोदण्यासाठी लागणारा पैसा खूप लागतो,त्यामुळे गरीब शेतकरी विहीर खोदु शकत नाही,या गरिबाच्या समस्येला दूर करण्यासाठी शासनाने राबविण्यात आलेल्या Vihir Anudan Yojana योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन शेतकऱ्याला अनुदान देते.

किती मिळणार Vihir Anudan योजनेअंतर्गत पैसे?

महाराष्ट्र शासनाने लाभला दिलेल्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या उपयोगाची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे विहीर या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला Vihir अनुदान मिळणार आहे या अनुदानामध्ये 4 लाखाची अनुदान शेतकऱ्यांना थेट मिळणार आहे .त्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये ओलिताचे पीक घेऊ शकतो, तसेच उत्पादनामध्ये भर होऊ शकते;त्याचप्रमाणे आपण बघत असतो की शेतकऱ्याची काय दशा आहे? शेतकऱ्याच्या भावाला हमीभाव मिळत नाही, आणि त्यातही कोरडवाहू शेतकरी त्यांचे तर हालच होतात, परंतु आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर मिळाल्यामुळे शेतकरी ओलिताचे पीक करू शकतो,व त्यांच्या उत्पन्नामध्ये भर मिळून शेतकरी पुढे जाऊ शकतो.
मनरेगा अंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात येते

मागेल त्याला Vihir योजना अंतर्गत विहीर मिळेल

मनरेगा योजनेअंतर्गत राबविण्यात आलेली आहे या योजनेमध्ये अनेक शेतकरी पात्र होऊ शकतात,शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा यासाठी योजना राबविण्यात आलेली आहे.या योजने अंतर्गत Vihir बांधण्याकरिता 4 लाखाचे अनुदान शासनाकडून देण्यात येते,त्यामुळे गरीब शेतकरी सुद्धा विहीर बांधण्यास पात्र ठरू शकतो, तसेच या योजनेचा लाभ घेऊ शकतो, त्यामुळे लवकरच ऑफलाइन फॉर्म भरावा व योजनेकरता पात्र व्हावे.

दुग्ध व्यवसाय(Dairy Farming) कसा सुरू करावा? How to Start a Dairy Farming Business Information in Marathi

योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराची पात्रता Vihir Anudan Yojana Maharashtra Eligibility

1. लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर एवढे क्षेत्र असावे
2. 150 मीटर अंतर दोन विहिरीमधील असावे
3. कर्जदाराच्या सातबारावर विहिरीची नोंद असेल तर तो दुसरी विहीर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही
4. विहिरीचा लाभ घेणाऱ्याकडे जॉब कार्ड असावे
5. एकापेक्षा अधिक लाभधारक योजनेचा फायदा घेऊ शकणार आहे परंतु त्यांच्याकडे 0.5 हेक्टर एवढी जमीन असावी लागते.

पिठाची गिरणी व्यवसाय कसा सुरू करायचा? Flour mill business in Marathi

विहीर योजने करता शेतामध्ये विहीर Required Documents for Vihir Yojana

आधार कार्ड
जातीचा दाखल
रेशन कार्ड
सातबारा
आठ- अ ऑनलाईन उतारा
जॉब कार्ड

ज्याच्याकडे वरील सर्व कागदपत्रे असतील, त्यालाच या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा मिळणार नाही.

 

अर्ज कसा व कुठे करायचा?

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत चार लाख रुपये अनुदान मिळण्यासाठी अर्ज हा ग्रामपंचायत मध्ये करायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत ग्रामपंचायत मध्ये अर्ज स्वीकारण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज करायचा आहे.

अर्ज डाऊनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

अर्ज भरण्याकरता हा pdf  बघा व त्याप्रमाणे अर्ज भरा

 

विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची निवड:

विहीर योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड पुढील प्रमाणे बघा
अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, दारिद्र रेषेखाली लाभार्थी, स्त्री करता असलेली कुटुंबे,शारीर दृष्ट्या विकलांग व्यक्ती, सीमांत शेतकरी म्हणजेच 2.5 एकर पर्यंत भूधारणा असलेले शेतकरी, इंदिरा आवास योजनेचा लाभ घेतलेले,अल्पभूधारक शेतकरी पाच एकरापर्यंत मर्यादित जमीन असलेले शेतकरी म्हणजेच अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये येतात,या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, त्याचप्रमाणे वीर योजनेच्या लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असावे लागणार आहे.

अशाप्रकारे शासनाने राबविण्यात आलेल्या Vihir Anudan Yojana Maharashtra अंतर्गत सर्व जण लाभ घेऊ शकतात,या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लोकांपर्यंत विहीर पोहोचवणे व शेतकऱ्यांना पुढे नेणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, यामुळे या योजनेचा अर्ज भरा, व विहीर अनुदान योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment