आता या रेशन कार्ड धारकांना सुद्धा मिळणार आयुष्यमान कार्ड, जाणून घ्या कुणाला मिळेल लाभ | White Ration Card News

राज्यातील पांढऱ्या रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, व त्यानुसार पांढऱ्या रेशन कार्डधारकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता किंवा काही बाबी पूर्ण कराव्या लागणार आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना यापूर्वी व आतापर्यंत सुद्धा आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जातो, परंतु पांढऱ्या रेशन कार्ड धारक नागरिकांच्या कुटुंबीयांना मात्र आयुष्यमान योजनेचा लाभ यापूर्वी दिला जात नव्हता, परंतु नवीन निर्णयानुसार आता पांढऱ्या रेशन कार्ड धारक नागरिकांना सुद्धा आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 

 

आयुष्यमान योजनेअंतर्गत व्यक्तीला पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार दिला जातो, तसेच या योजनेच्या माध्यमातून अनेक रेशन कार्ड धारक नागरिकांनी आतापर्यंत लाभ मिळवलेला आहे, योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार मिळाल्याने अनेक गरीब नागरिकांना जीवनदान मिळालेले आहे, त्यामुळे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा आयुष्यमान कार्ड काढण्यास मदत केली जाईल, आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी त्यांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे, त्यानंतर आयुष्यमान कार्ड काढता येईल.

 

पांढऱ्या रेशन कार्डधारकांनी सर्वप्रथम आपल्या पांढऱ्या रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना एक प्रकारचे आवाहन केले जात आहे, की पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनी रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करून घ्यावे, त्यानंतर त्यांना आयुष्यमान कार्डचा पुरवठा सुद्धा केला जाईल, व मोफत उपचार त्यांना सुद्धा दिले जाईल. अशाप्रकारे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत एक चांगला बदल,बघा संपूर्ण माहिती 

Leave a Comment