बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा राज्यातील या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर या भागात वर्तवला येल्लो अलर्ट | Yellow Alart 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे, अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पुर येऊन नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहे, तसेच हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असल्याने, राज्यासह इतर भागांमध्ये जोर दार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावलेली आहे, गेल्या एक ते दोन दिवसांमध्ये अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागांमध्ये पाऊस चालू आहे, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. 

 

पावसाचा जोर कोकण, मध्य महाराष्ट्र, सह पूर्व विदर्भामध्ये जास्त बघायला मिळत आहे, कोकणातील रत्नागिरी, रायगड त्यासह विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे, तसेच अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला असून, अशा भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे.

 

राज्यातील नाशिक, नगर, परभणी, जालना, लातूर, बुलढाणा, वाशिम, अकोला या भागांमध्ये येलो अलर्ट हवामान विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे, अशा प्रकारे राज्यातील साधारणतः सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे, कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा परिणाम राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ऑनलाईनच नव्हे तर ऑफलाइन पद्धतीने सुद्धा भरता येणार अर्ज, बघा संपूर्ण माहिती 

Leave a Comment