पिंक इ रिक्षा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार लाभ, पात्रता आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती | Pink E Rickshaw Yojana

राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारचे निर्णय शासन निर्णय मधून घेण्यात आलेलीले आहे, महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेल्या आहे, महिलांना एक प्रकारे स्वावलंबी होता यावे स्वतःचा व्यवसाय चालू करता यावा याकरिता पिंक रिक्षा योजना शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या अंतर्गत कोणत्या महिला पात्र ठरणार आहे? तसेच योजनेची पात्रता अटी तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्याचबरोबर पिंक रिक्षा योजनेचा जीआर सुद्धा शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे. 

 

महिलांना कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल, तर त्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन मिळावे त्यांना मदत व्हावी व्यवसाय चालू करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी पीक ई-रिक्षा योजना चालू करण्यात आलेली असून, योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ दिला जाईल, त्यामुळे महिला स्वतःचा व्यवसाय सुद्धा चालू करू शकते, पिंक रिक्षा योजनेच्या माध्यमातून रिक्षा किमतीच्या 70 टक्के एवढे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे, व 20 टक्के एवढा भार शासनाच्या माध्यमातून उचलला जाईल.

 

पिंक रिक्षा योजनेअंतर्गत महिलांना व मुलींना लाभ घेता येईल, त्याकरिता महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या महिला व मुली अर्ज करू शकतात, तसेच त्यांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे दरम्यानची असावी. महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त असू नये, बँकेचे खाते पुस्तक उपलब्ध असावे. महिलेकडे वाहन चालक परवाना असावा. अशा प्रकारच्या पात्रता निकष योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या आहे, या पात्रता निकष मध्ये जर महिला पात्र असतील तर अर्ज करता येणार आहे.

 

योजनेच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे लागतील, त्यामध्ये अर्जदार महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड, खाते पुस्तक, मोबाईल क्रमांक, अधिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, चालक परवाना, रेशन कार्ड अशाप्रकारे संपूर्ण कागदपत्र अर्ज करत असताना महिलेकडे उपलब्ध असावे लागते. महिलांसाठी अशा प्रकारे पिंक इ रिक्षा योजना चालू करण्यात आलेली आहे.

 

खरीप पिक विमा भरण्यासाठी 4 दिवस बाकी, लवकरात लवकर पिक विमा भरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन 

Leave a Comment