महाराष्ट्रातील 52 लाखाहून अधिक कुटुंबांना मिळणार दरवर्षी 3 मोफत सिलेंडर | Mofat Silendar 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून 28 जून 2024 रोजी सर्व सामान्य महिलांसाठी चा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, व महाराष्ट्र राज्यामध्ये अन्नपूर्णा योजना चालू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, या योजनेची अंमलबजावणी येणाऱ्या काही दिवसातच केली जाणार आहे, या योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत दिले जाईल, त्यामुळे एक प्रकारे महिलांना सिलेंडरवर जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही तीन सिलेंडर ऐवजी जास्त सिलेंडर घेतले असता त्याचे पैसे मात्र महिलांना भरावे लागेल परंतु तीन सिलेंडर वार्षिक मोफत दिले जाईल.

 

अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील तब्बल 52 लाखाहून अधिक कुटुंबीयांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे संबंधित अटी व शर्ती आतापर्यंत देण्यात आलेल्या नाही परंतु या संबंधित संपूर्ण माहिती येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट केली जाईल, त्यानंतर अन्नपूर्णा योजना अंमलबजावणी मध्ये आणली जाईल व लाखो महिलांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत दिले जाईल.

 

कुटुंबामध्ये स्वयंपाकासाठी इंधनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत होता परंतु आता तीन सिलेंडर मोफत दिले जाणार असल्याने कुटुंबातील आर्थिक बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच, स्वच्छ इंधन महिलांना उपलब्ध होणे अशा प्रकारे विविध उद्देश शासनाच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना चालू करताना ठेवण्यात आलेले आहे. महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना 28 जून 2024 रोजी राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, महिलांसाठी लाडकी बहीण योजना यासह अन्नपूर्णा योजना तसेच इतरही योजना राबविल्या जात आहे, पिंक इ रिक्षा योजना सुद्धा महिलांसाठी चालू करण्यात आलेली आहे.

 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना लाभ घ्यायचा असेल तर येणाऱ्या काही दिवसातच अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे कारण ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया कशी पूर्ण करायची? या संबंधित माहिती शासनाच्या माध्यमातून लवकरच दिली जाईल, तसेच आवश्यक पात्रता काय आहे? कोणत्या कुटुंबातील महिला पात्र ठरतील अशा प्रकारची संपूर्ण माहिती लवकरच शासनाच्या माध्यमातून दिली जाईल.

 

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत अर्ज सुरू, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार एक रकमी 3 हजार रुपयांची रक्कम

Leave a Comment