रेशन कार्ड धारकांना मिळणार गव्हा ऐवजी ज्वारी, गव्हाचे वितरण बंद होणार | Resion Card 

देशामध्ये मोठ्या प्रमाणात रेशन कार्डधारक नागरिक आहे त्यांना दर महिन्याला गहू व तांदुळाचे वितरण केले जाते, परंतु आता येत्या ऑगस्ट महिन्यापासून अशाच शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच रेशन कार्ड धारकांना तांदुळासोबत गहू न मिळता आता ज्वारी दिली जाणार आहे, कारण केंद्र शासनाच्या माध्यमातून भरडधान्य खरेदी अंतर्गत ज्वारीची खरेदी केलेली आहे, त्यामुळे रेशन कार्ड धारकांना एरवी मिळणारे चार किलो तांदूळ व एक किलो गहू या ऐवजी ज्वारी दिली जाणार आहे. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण बातमी रेशन कार्ड धारक नागरिकांसाठीची आहे. 

 

तर कोणत्या नागरिकांना म्हणजेच कोणत्या रेशन कार्ड धारक नागरिकांना ज्वारी व तांदूळ मिळणार यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी अंतोदय अन्न योजनेतील लाभार्थी अशांना लाभ दिला जाणार आहे केशरी रेशन कार्ड धारक नागरिक यामध्ये पात्र नसतील कारण केशरी रेशन कार्ड धारकांची रेशन धान्य मिळणे मागील बऱ्याच महिन्यापूर्वी बंद झालेले आहे, कारण त्यांना रेशन ऐवजी प्रति व्यक्ती याप्रमाणे रक्कम दिली जाते, ज्यांचे रेशन धान्य आतापर्यंत सुरू होते अशांनाच लाभ दिला जाईल.

 

भरडधान्य खरेदी अंतर्गत ज्वारीची खरेदी करण्यात आलेली असली तरी सुद्धा ज्वारीच्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेली नाही, म्हणजेच पूर्वी चार किलो तांदूळ व एक किलो गहू याप्रमाणे धान्य वितरण केले जात होते, व आता सुद्धा चार किलो तांदूळ व गव्हा ऐवजी एक किलो ज्वारी अशा प्रकारे वितरण रेशन कार्ड धारकांना केली जाणार आहे, व यांच्या ऑगस्ट महिन्यापासून हे वितरण केले जाईल, अशाप्रकारे रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी असून त्यांना गव्हा ऐवजी ज्वारी मिळणार आहे.

 

तुरीच्या शेंड्याची या कालावधीत कापणी करा, उत्पादनात होणार भरगोस वाढ 

Leave a Comment