शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बियाणे प्रक्रिया संचासाठी मिळणार 10 लाखांचे अनुदान लगेच या तारखेपर्यंत अर्ज करा | Biyane Prakriya Sanch 

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी उत्पादक कंपनी व्यवसाय चालू करण्यासाठी इच्छुक असेल अशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून बियाणे प्रक्रिया संच्यासाठी तब्बल दहा लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे, तसेच त्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, अर्ज करण्यासाठी नोंदणी कृत शेतकरी उत्पादक कंपनी यांना अर्ज सादर करता येणार आहे व हा अर्ज सादर करत असताना राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करणे गरजेचे असणार आहे. 

 

बीज प्रक्रिया प्रकल्पाचा जो लक्षांक ठरवण्यात आलेला आहे त्यानुसार अर्ज घेण्यात येत असून 31 जुलै 2024 पर्यंत इच्छुक असणाऱ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असणार आहे, व बीज प्रक्रिया संच साठी 50 टक्के एवढे अनुदान दिले जाणार असून दहा लाख रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाईल 50% किंवा दहा लाख यापैकी जे जास्त असेल ते दिले जाईल.

 

लाभ घेऊन इच्छिणाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागणार आहे, त्यानंतर जेव्हा बँकेकडून कर्ज मंजूर म्हणजे उपलब्ध करून दिले जाईल तेव्हा शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे ज्यांनी अर्ज केलेला असेल असे लाभासाठी पात्र ठरतील, संपूर्ण कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर बियाणे संच्याच्या उभारणीस सुरुवात करावी लागेल, व एक वर्षाच्या आत हे बियाणे संच उभारावे लागेल.

 

शासनाच्या माध्यमातून पन्नास टक्के म्हणजेच दहा लाख रुपये पर्यंतचे जास्तीत जास्त अनुदान प्रकल्पासाठी दिले जाईल, त्यांना अर्ज करायचा असेल अशांनी 31 जुलै 2024 या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे, कारण या तारखेनंतर मात्र अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये हा अर्ज जमा करता येणार आहे.

 

कापसावर येतोय लाल्या रोग, शेतकऱ्यांनो लगेच नियंत्रण करा अथवा, उत्पादनात होणार मोठी घट

Leave a Comment