दुधाला मिळणार प्रति लिटर 5 रुपये एवढे अनुदान, अर्ज करण्याची तारीख वाढली, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज | Dudh Anudan 

राज्य शासनाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, व त्यानुसार राज्यातील गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये एवढे अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले होते, व आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

 

दुधाला अत्यंत कमी दर मिळत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे उत्पादन करणे परवडत नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर एवढे अनुदान देण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यामध्ये, सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्पांना जे शेतकरी दूध पुरवठा करतात अशांना अनुदान दिले जाणार आहे.

 

खाजगी दूध प्रकल्प, दूधे शितकरण केंद्र आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी, सहकारी कंपनी यांना विहित नमुन्यातील अर्ज प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे, व अर्ज प्रक्रिया ही, दुग्ध व्यवसाय व विकास विभाग यांच्याकडे अर्ज सादर करणे गरजेचे आहे, अशाप्रकारे दुध व्यवसाय करत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून त्यांना अर्ज प्रक्रिया 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करता येणार आहे.

 

अनुदानाचा लाभ घेत असताना शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार कार्ड पशुधनाच्या कानातील बील्ल्यांशी लिंक असणे आवश्यक असणार आहे. अशाप्रकारे 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी दूध अनुदान प्रतिलेटर पाच रुपये मिळवायचे असल्यास अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

 

अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत मिळणार बांधकाम कामगारांना लाभ, लगेच अर्ज करा

Leave a Comment