हवामान विभागाने वर्तवला राज्यातील पावसाचा अंदाज, या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता | Havaman Andaj 

हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून राज्यातील काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे, म्हणून काही दिवसात राज्यातील विविध भागात पाऊस झालेला नव्हता, त्यामुळे शेतकरी चिंतीत असताना आता मात्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, त्यामुळे राज्यातील कोणत्या भागांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो, तेव्हा पडणाऱ्या भागासंबंधित माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

राज्यातील सर्व भागातील पेरणा पूर्ण झालेल्या आहे त्यामुळे पेरण्या झाल्यानंतर पिकाला पावसाची आवश्यकता भासत आहे, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलून बघायला मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून हवामान विभागांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. पाऊस आल्याने पिकांना एक प्रकारचे जीवनदान मिळालेले आहे.

 

मागील दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे तर हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार मुंबईमध्ये येल्लो अलर्ट पावसाचा व्यक्त केलेला आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा व्यक्त केलेला आहे. राज्यातील काही भागात नदी नाले ओसंडून वाहणारा पाऊस झालेला आहे, तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो.

 

हवामान विभागाने राज्यातील ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली असल्याने, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तसेच सर्व सामान्यांनी काळजी घ्यावी कारण येणारा पाऊस मुसळधार स्वरूपाचा असणार आहे, अशाप्रकारे हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून मुंबई, ठाणे व पालघर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा दिलेला आहे.

 

खरीप पिक विमा भरण्याची तारीख वाढली, या तारखेपर्यंत भरता येणार शेतकऱ्यांना पीक विमा 

Leave a Comment