कापूस, सोयाबीन, तूर दराची बाजार समितीतील वाटचाल कशी आहे? काय मिळतोय विविध मालाला दर | Kapus Dar 

देशामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते,परंतु गेल्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळालेला नाही, हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर कापसाचे दर जाऊन पोहोचलेले होते परंतु आता कापसाला काय दर मिळतो आहे? हा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे, कारण जेव्हा कापसाला चांगला दर मिळेल अशा वेळी कापसाची विक्री करून अशा विचारांनी अनेक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवलेली होती, व अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच सध्याच्या स्थितीमध्ये कापसाला मिळत असलेला दर 7300 ते 7900 रुपये एवढा मिळत आहे, अभ्यासकांच्या मते कापसाचा हा दर अजूनही काही दिवस अशाच प्रकारे टिकून राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षीची स्थिती अत्यंत बेकार होऊन बसलेली आहे, कारण सोयाबीनला हंगामाच्या सुरुवातीपासूनच अगदी नीचांकी दर मिळताना दिसतो, त्यामुळे अनेक शेतकरी मात्र नाराज झालेले आहे, कारण सोयाबीन वर केलेला खर्च सुद्धा या दरामुळे निघणे कठीण होऊन बसलेले होते, आता सोयाबीनला मिळत असलेला दर साधारणतः 4100 ते 4500 रुपये एवढा मिळत आहे. सोयाबीनचे दर सुरुवातीपासूनच वाढलेले नाही, तसेच येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये अशाच प्रकारची सोयाबीन दराची स्थिती राहणार असल्याचा अंदाज तज्ञांच्या मते व्यक्त करण्यात आलेला आहे.

 

तुरीला पूर्वीपासूनच चांगल्या प्रकारचा दर मिळालेला आहे, तुरीच्या दरांमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार बघायला मिळालेले होते, परंतु इतर म्हणजेच कापूस व सोयाबीन या पिकांपेक्षा अत्यंत चांगला असा दर तुरीला मिळालेला आहे सध्याच्या स्थितीमध्ये 11500 रुपये पर्यंत तुरीला दर मिळताना दिसतो तसेच यावर्षी अनेक शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे.

 

भारतीय पोस्ट विभागाने काढली 44 हजार जागांची भरती, दहावी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी, लगेच ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment