लाडका भाऊ योजनेअंतर्गत तरुणांना कशाप्रकारे मिळणार विद्यावेतन? व किती महिने मिळणार? बघा संपूर्ण माहिती | Ladaka Bhau Yojana 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये माझा लाडका भाऊ योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यासंबंधी जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला असून, आता लाडक्या बहिणी योजनेच्या मागोमागच आता लाडक्या भावासाठी सुद्धा योजना राबवली गेली आहे, लाडका भाऊ योजनेचे नाव एक प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असून या योजनेच्या माध्यमातून बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून लाभ घेता येणार आहे, त्यामुळे योजना अंतर्गत नेमके विद्यार्थ्यांना कसे पैसे मिळणार? कोणत्या कालावधी मध्ये मिळणार? तसेच किती महिने मिळणार? यासंबंधी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

राज्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, बेरोजगारांची संख्या कमी व्हावी त्यांना एक प्रकारे रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे, या योजनेअंतर्गत युवकांना म्हणजेच विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, व सहा महिने हा रोजगार उपलब्ध असणार आहे, व विद्यार्थ्याला दर महिन्याला म्हणजेच बारावी पास असणाऱ्या तरुणाला सहा हजार रुपये, डिप्लोमा धारकाला आठ हजार रुपये तर पदवीधराला दहा हजार रुपये असे मासिक विद्यावेतन दिले जाईल.

 

शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबवली जाऊन युवकांना यामध्ये प्रशिक्षण दिले जाईल, व याच अनुभवाच्या तत्वावर सहा महिन्यानंतर इतरत्र ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्याला नोकरी मिळण्यास मदत होणार आहे तसेच सहा महिन्यानंतर त्याला प्रशिक्षण घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे, त्यामुळे त्याला इतर ठिकाणी रोजगार प्राप्त होण्यास मोठी मदत होणार आहे, विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी च्या माध्यमातून पैशाचे वितरण केले जाणार आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना अशा प्रकारे राबवली जाईल हे तुम्हाला कळलेलेच असेल.

 

खरीप पिक विमा भरण्याची तारीख वाढली, या तारखेपर्यंत भरता येणार शेतकऱ्यांना पीक विमा 

Leave a Comment