पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, 1 लाखा पासुन ते 25 लाखापर्यंतची मदत | Mahila Startap Yojana 

महिलांकरिता विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणी मध्ये आणल्या जातात त्यामध्ये महिलांना एक प्रकारची आर्थिक मदत देउन स्वावलंबी व्हाव्या त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करता यावा, त्याकरिता मदत दिली जाते, अशाप्रकारे एक योजना शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे, या योजनेची घोषणा करण्यात आलेली असून यासंबंधीचा जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे, त्या योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना असे आहे. योजनेअंतर्गत महिलांना एक लाखापासून ते 25 लाखापर्यंतची मदत दिली जाईल. योजनेच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया कशी पूर्ण करण्याची? कोणत्या महिलांना लाभ घेता येणार आहे? यासह इतरही संपूर्ण प्रकारची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

अनेक महिलांची इच्छा असते की आपण स्वतःचा व्यवसाय चालू करावा तसेच त्या स्वावलंबी होऊ शकतात परंतु त्यांना एक आर्थिक मदत मिळणे कठीण होऊन बसले त्यामुळे अशाच व्यवसाय चालू करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी महिला स्टार्टअप योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाणार आहे, योजनेच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातील महिला लाभ घेऊ शकतील, याचा मुख्य फायदा महिलांना होणार असून महिलांचे बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल व महिला स्वतः स्वावलंबी होऊन त्यांच्या पायावर उभ्या राहू शकणार आहे.

 

यापूर्वी जर शासनाच्या माध्यमातून असलेल्या योजनांचे अनुदान महिलेने मिळवलेले असेल तर या योजनेअंतर्गत महिला पात्र ठरू शकणार नाही. योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करावी लागेल याकरिता सर्वप्रथम https://www.msins.in/ या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण दिलेली माहिती पूर्णपणे भरावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा. अशाप्रकारे अत्यंत सहजरित्या महिलांना योजनेच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

 

पिंक इ रिक्षा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार लाभ, पात्रता आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती 

Leave a Comment