रेशन कार्डधारकांनी केवायसी पूर्ण केली नसल्यास त्यांचे रेशन कार्ड बंद होणार | Resion Card 

शासनाच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून रेशन कार्डधारक नागरिकांना सूचना दिल्या जात आहे, की त्यांनी लवकरात लवकर रेशन कार्डची केवायसी करून घ्यावी, त्यामुळे रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असुन त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी, परंतु रेशन कार्ड धारक नागरिकांनी असे न केल्यास धान्य बंद करणे ऐवजी थेट जांनी केवायसी केलेली नसेल त्यांचे रेशन कार्ड बंद केले जाणार आहे, त्यामुळे ही मोठी बाब लक्षात आलेली आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल अशांनी केवायसी करणे बंधनकारक असून लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करावी. 

 

केवायसी करण्यासाठी अगदी काही प्रमाणात कागदपत्रे उपलब्ध असावे लागतात, त्याचप्रमाणे केवायसी करण्याची प्रक्रिया सुद्धा अत्यंत सुलभ आहे, व रेशन कार्डधारक नागरिकांना आपली केवायसी झालेली आहे की नाही हे ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या सुद्धा चेक करता येणार आहे, देशामध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करून अयोग्य पद्धतीने रेशनचा लाभ अयोग्य व्यक्तींना दिला जातो व अशाच प्रकारच्या बाबी बंद पडाव्यात योग्य रेशन कार्ड धारक नागरिकाला रेशन मिळावे अशा प्रकारचा उद्देश शासनाच्या माध्यमातून केवायसी मध्ये ठेवण्यात आलेला आहे.

 

केवायसी करत असताना रेशन कार्ड धारक नागरिकांकडे आधार कार्ड उपलब्ध असावे, हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे, त्याबरोबरच मोबाईल क्रमांक व पासपोर्ट साईज फोटो सुद्धा उपलब्ध असणे गरजेचे आहे, याच कागदपत्रावरून केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, केवायसी केल्यानंतर केवायसी स्थीती बघायची असेल तर, राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे ती वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यानंतर केवायसी ची स्थिती चेक करता येणार आहे अशा पद्धतीने रेशन कार्डधारकांना केवायसी ची स्थिती चेक करता येणार आहे.

 

70 वर्षांपुढील वृद्धांना मिळणार आयुष्यमान योजने अंतर्गत मोफत उपचार, जाणून घ्या लाभ कसा मिळवायचा

Leave a Comment