मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत अर्ज सुरू, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार एक रकमी 3 हजार रुपयांची रक्कम | Vayoshri Yojana 

राज्य शासनाच्या माध्यमातून वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविले जातात, व त्यातील म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय, या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, व अर्ज घेणे सुरू करण्यात आलेले आहे, त्यामुळे तुम्ही जर एक जेष्ठ नागरिक असाल तर मुख्यमंत्री व वयोश्री योजना अंतर्गत अर्ज करून तीन हजार रुपयांची रक्कम मिळू शकणार आहात. 

 

राज्यामध्ये वयोवृद्ध नागरिकांचे प्रमाण म्हणजे संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना दिसण्यास त्रास होणे, त्यामुळे चष्म्याची गरज तसेच कानाने कमी ऐकू येणे त्यासाठीचा श्रवण यंत्र तसेच डोळ्यासाठी चष्मा अशीच उपलब्धता व्हावी, म्हणजे या संपूर्ण गरजेच्या वस्तू वृद्धांना खरेदी करता याव्या याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना चालू करण्यात आलेली आहे.

 

वयोश्री योजना अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावर एक रकमी 3 हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली असून, योजनेसाठीचे अर्ज करण्याचे आवाहन वृद्धांना करण्यात आलेले आहे, मुख्यमंत्री यशस्वी योजनेअंतर्गत या नागरिकांचे वय 65 वर्षाच्या वर आहेत अशांना लाभ घेता येणार आहे, काही जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहे.

 

अर्ज करत असताना काही आवश्यक कागदपत्र त्यासोबत जोडावी लागणार आहे, तसेच अर्ज सहाय्यक समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अर्ज दाखल करता येणार आहे, आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पासपोर्ट साईज दोन फोटो, राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स, इतर एक ओळखपत्र, वयाचे प्रमाणपत्र, दोन लाखापेक्षा वृद्धाची वार्षिक उत्पन्न जास्त नसावे, त्यामुळे उत्पन्नाचा दाखला जमा करावा, सहाय्यक समाज कल्याण विभागामध्ये हा अर्ज जमा करावा लागेल.

 

पी एम किसान योजनेअंतर्गत 6 हजारा ऐवजी 8000 मिळणार?, निर्मला सीतारामन यांची मागणी

Leave a Comment