बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कारण अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत बांधकाम कामगारांना लाभ दिला जाणार आहे, जे बांधकाम कामगार नोंदणीकृत असेल अशांना घरकुल म्हणजेच आवास योजनेचा लाभ दिला जाईल, ज्या बांधकाम कामगारांचे घर पक्के नसेल अशांना योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार असून यामुळे बांधकाम कामगारांचे पक्के घर बनवण्याचे स्वप्न सुद्धा पूर्ण होणार आहे, अशा स्थितीमध्ये ज्या बांधकाम कामगारांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
देशामध्ये विविध प्रकारच्या आवास योजना राबवल्या जातात व त्यातील एक आवास योजना म्हणजेच अटल बांधकाम कामगार आवास योजना होय, या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना लाभ दिला जाणार आहे, त्यामुळे तुम्ही बांधकाम कामगार असाल व त्यांची नोंदणी असेल तर लाभ दिला जाणार आहे परंतु ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी सक्षम नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी सक्षम करून घ्यावी.
ग्रामीण भागातील असणाऱ्या बांधकाम कामगारांना पक्के घर उपलब्ध व्हावे, योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या नावावर किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर पक्के घर नसावे तरच लाभ मिळणार आहे, कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, पासपोर्ट साईज फोटो, अशा प्रकारची कागदपत्रे अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकाकडे उपलब्ध असावी व या कागदपत्रावरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
खरीप पिक विमा भरण्याची तारीख वाढली, या तारखेपर्यंत भरता येणार शेतकऱ्यांना पीक विमा