70 वर्षांपुढील वृद्धांना मिळणार आयुष्यमान योजने अंतर्गत मोफत उपचार, जाणून घ्या लाभ कसा मिळवायचा? | Ayushman Yojana 

देशामध्ये विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, विद्यार्थी वृद्ध या सर्वांसाठी विविध प्रकारचे योजना राबवून त्यांचा विकास साधला जावा हा प्रयत्न केला जातो, व वृद्धांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून सत्तर वर्षावरील सर्व वृद्धांना योजने अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घोषणा पत्रामध्ये योजनेअंतर्गत वृद्धांना मोफत उपचार दिला जाईल याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही वृद्धांना आयुष्यमान योजनेअंतर्गत मोफत उपचार दिला जाईल, यासंबंधीचे भाष्य केलेले होते अशी माहिती राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी दिलेली आहे, वर बोलताना म्हणाल्या की भाजप सरकारने चांगली कामगिरी केलेली असून मोठ्याच प्रमाणात पैशाचे ट्रान्सफर सुद्धा करण्यात आलेले आहे, त्यामधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केले जाणार आहे.

 

वृद्ध व्यक्तीची जसजसं वय वाढत जाते, तसतसे त्यांचे आजार उमळत जात असल्याने त्यांना आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते, त्यामुळे हे पैसे कुठे उपलब्ध होईल किंवा आपल्या आजारावर निदान लावता येणार की नाही याचीच चिंता वृद्धांना असल्याने, आता वृद्धांना कोणताही आजार झाला तर मोफत उपचार दिला जाणार आहे, त्यामुळे अशा मध्यमवर्गीय किंवा गरीब मुलांना कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज आता उरलेली नाही.

 

आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून आता वृद्ध व्यक्तींना सुद्धा आणले जाईल, व आयुष्यमान योजनेचा विस्तार केला जाणार आहे, त्यात वृद्धांचा समावेश असेल व योजनेच्या माध्यमातून आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्यांना पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार दिला जाणार आहे तसेच चांगल्या प्रकारची आरोग्याची सुविधा सुद्धा उपलब्ध जाईल. अशाप्रकारे वृद्ध व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून त्यांना एक प्रकारचा दिलासा या योजनेमधून मिळू शकतो.

 

या बँकेत जमा केलेल्या पैशांवर मिळणार 9.75% व्याज, जाणून घ्या काय आहे योजना 

Leave a Comment