7वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, 5793 जागांची जिल्हा न्यायालय भरती, ऑनलाईन अर्ज पद्धत | District Court Recruitment

अनेक उमेदवार नोकरीसाठी इच्छुक असतात त्यामुळे अशा उमेदवारांना एक अत्यंत चांगली नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते, कारण जिल्हा न्यायालय भरती केली जाणार आहे, व त्यामध्ये 5793 जागांची ही भरती असणार आहे, भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023

एकूण पदसंख्या – 5793 जागा

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन पद्धतीने

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे तसेच ही भरती संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अटी व शर्ती उमेदवारांनी जाणून घ्याव्यात, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादेची अट पदांचा असलेले वेतन या संपूर्ण बाबी उमेदवारांनी जाणून घ्यायला हव्यात.
  • तसेच संबंधित पदभरतीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व ती जाहिरात शेवटी देण्यात आलेली आहे त्यामुळे त्या जाहिरातीचा सुद्धा एकदा आढावा उमेदवारांनी घ्यावा.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड योग्य साईज नुसार करावे.
  • अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती उमेदवारांनी भरूनही योग्य व खरी असलेली माहिती अर्ज भरताना भरावी.
  • अर्ज भरल्यानंतर अर्ज फी सुद्धा ऑनलाइन पद्धतीने अदा करावी.
  • अर्ज भरताना एक महत्त्वाची बाब म्हणजे अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जाणून घ्यायला हवी त्या संबंधित शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023

जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

पदाचे नाव, पदसंख्या व पदांनुसार वेतन

क्र पदाचे नाव पदसंख्या वेतन (रू)
1 लघुलेखक (श्रेणी 3) 714 38,600 ते 1,22,800
2 कनिष्ठ लिपिक 3495 19,900 ते 63, 200
3 शिपाई/हमाल 1584 15,000 ते 47,600

पदानुसार शैक्षणिक पात्रता

  • लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी कोणत्याही शाखेतील एक पदवी असावी. तसेच इतर सुद्धा अटी आहे त्यासाठी जाहिरात बघावी.
  • कनिष्ठ लिपिक या पदासाठी सुद्धा कोणत्याही शाखेतील एक पदवी असणे गरजेचे आहे.तसेच इतर सुद्धा अटी आहे त्यासाठी जाहिरात बघावी.
  • शिपाई या पदासाठी शरीरयष्टी चांगली असावी तसेच उमेदवार हा कमीत कमी सातवी पास असणे गरजेचे आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment