विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील या 3 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वर्तवला येल्लो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता | Chance of Rain

हवामान विभागाने पावसा बाबत नवीन अंदाज जारी केलेला आहे, त्यानुसार राज्यातील विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले मिगजौम चक्रीवादळ यामुळे राज्यांमध्ये पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे.

तसेच बंगालच्या उपसागरातील पूर्व किनारपट्टीवरच्या भागांमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू झालेला आहे. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेले असून राज्यातील मराठवाडा तसेच विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यामध्ये नांदेड तसेच लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वीसुद्धा विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे शेती पिकांना मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला अवकाळी पाऊस व गारपीटी मुळे पिके उध्वस्त झाली व अशा परिस्थितीमध्ये हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा वर्तवलेला आहे व त्याचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा जाणवू शकतो. त्यामध्ये एक प्रकारची चिंता शेतकऱ्यांना अर्थातच लागलेली आहे.

हवामान विभागाचा या जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा

किमान तापमानामुळे राज्यात उखाडा जाणवत आहे, थंडी गायब झालेली असून पावसाची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे, त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील यवतमाळ, गडचिरोली तसेच गोंदिया मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे व येल्लो अलर्ट या तीन जिल्ह्यांना दिलेला आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेती पिकाची काळजी घ्यावी.

विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील या 3 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वर्तवला येल्लो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता | Chance of Rain

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आले का! घरबसल्या मोबाईल वरून फक्त दोन मिनिटात!

Leave a Comment