शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात, तसेच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, तसेच त्यांना आर्थिक मदत व्हावी, या कारणाने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्यापैकीच एक योजना म्हणजेच प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना होय. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक शेतकरी लाभ घेत आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कागदपत्रे जोडून शेतकऱ्यांना अगदी सहजरित्या या योजनेचा लाभ घेता येतो.
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेअंतर्गत, साठ वर्षावरील शेतकऱ्यांना महिन्याला तीन हजार रुपये पर्यंतची रक्कम देण्यात येते या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरावा लागेल तसेच योजनेअंतर्गत अर्ज भरल्यानंतर, शेतकऱ्यांकडे या योजनेसाठी लाभ घेताना दोन हेक्टर पर्यंतची जमीन असावी.
योजनेचा लाभ 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात त्यामध्ये अठरा वर्षाचे वय असणाऱ्या शेतकऱ्याला 55 रुपये प्रति महिना रक्कम भरावी लागेल, तसेच जर शेतकऱ्याचे वैतीस वर्षे असेल तर त्या शेतकऱ्याला प्रति महिना 110 रुपये भरावे लागेल. चाळीस वर्षापेक्षा अधिक वय असल्यास शेतकऱ्याला दोनशे रुपये प्रति महिना एवढी रक्कम भरावी लागेल. साठ वर्षापर्यंत ही रक्कम भरावी लागेल.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम maandhan.in ही वेबसाईट ओपन करा. त्यामध्ये विचारले गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी वगैरे येईल तो सबमिट करून योग्य प्रकारे माहिती व कागदपत्रे अपलोड करावी त्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र ठरनार. शेतकऱ्यांना साठ वर्षाचे वय झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रति महा एवढी रक्कम देण्यात येईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आले का! घरबसल्या मोबाईल वरून फक्त दोन मिनिटात!