महिलांना मिळणार ड्रोन, तब्बल 8 लाख रुपये पर्यंतचे अनुदान, सोबत प्रशिक्षण सुद्धा |  drone scheme for women

मंत्रिमंडळामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानुसार महिलांना अनुदानावर ड्रोन देण्यात येणार आहे, 29 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचत गटांना अनुदानावर ड्रोन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 2023-24 ते 2025-26 या कालावधीसाठी 1261 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे व या नीधी मधूनच महिलांना ड्रोनसाठीचे अनुदान देण्यात येईल. तब्बल 15000 निवडक महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यात येणार आहे. महिला बचत गटांना ड्रोन दिल्यानंतर महिला बचत गटा अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये ड्रोन भाड्याने देण्यात येईल व त्यावरच महिला बचत गट सुद्धा चांगली आर्थिक कमाई करू शकेल.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्दिष्टानुसार महिलांचे सक्षमीकरण वाढवणे तसेच शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करणे या उद्देशाने ड्रोन चा वापर शेतीमध्ये वाढवा या उद्देशाने महिलांना अनुदान देण्यात येईल. तसेच ड्रोन च्या किमतीच्या 80 टक्के रक्कम आर्थिक सहाय्य अंतर्गत 8 लाख रुपये पर्यंतचे अनुदान देण्यात येईल.

महिलांना ड्रोन चा वापर कशा पद्धतीने करायचा यासंबंधीची प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. महिला बचत गटांना खरेदीसाठी अनुदान दिल्यानंतर महिला बचत गट दोन खरेदी करेल व शेतकऱ्यांना भाड्याने देऊन, वार्षिक एक लाख रुपये पर्यंतची रक्कम महिला बचत गट कमवू शकेल अशा प्रकारची संकल्पना मांडण्यात आलेली आहे.

महिलांना मिळणार ड्रोन, तब्बल 8 लाख रुपये पर्यंतचे अनुदान, सोबत प्रशिक्षण सुद्धा |  drone scheme for women

शेतकऱ्यांवर शेतातील डीपी बिघडली, अशा पद्धतीने तक्रार करून तीन दिवसात डीपी मिळवा

Leave a Comment